मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर तो जनतेपुढे मांडला जाईल. या ४० मुद्द्यांच्या अजेंड्यांत शेती, रोजगारनिर्मिती, दुष्काळ निवारण व उद्योगवाढीवर भर आहे.राष्टÑपती राजवट लागू असूनही सत्ता स्थापनेसाठी बैठका सुरू आहेत. बिगर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादीच्या समन्वय समितीची दहा तास बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे व विजय वडेट्टीवार, राष्टÑवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ व नसीम खान, तर शिवसेनेकडून सुभाष देसाई व एकनाथ शिंदे हजर होते.सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून किमान समान कार्यक्रमात वादग्रस्त मुद्दे टाळले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.राज्यात महापूर आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. शिवाय, बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणे, जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देणेआणि महिलांना स्वयंपूर्ण बनविणे, या बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असे राष्टÑवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.>शरद पवार भेटणार सोनिया गांधींनाराज्यात सत्तास्थापनेला वेग आलेला असतानाच राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पद आणि जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Government: शिवसेना, आघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 6:25 AM