शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Maharashtra Election2019 : राजमान्य राजश्री राज्याचे कारभारी पहिलवान! पत्रास कारण की...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 4:46 PM

तुम्ही तेल लावून आखाड्यात उतरल्याचं (तुमच्याकडूनच) अवघ्या महाराष्ट्राला समजलं....

स. न. वि. वि. पत्रास कारण की , तुम्ही तेल लावून आखाड्यात उतरल्याचं (तुमच्याकडूनच) अवघ्या महाराष्ट्राला समजलं. अन् तुम्हाला समोर कुणी पहिलवानच दिसेना झालाय. तेव्हा म्हटलं तुमच्याकडून काही गोष्टींचा खुलासा घ्यावा अन् तुम्हाला काही गोष्टींचा खुलासा करावा...१) तुम्हाला तेल लावणारा तुमचा शागीर्द कोण? जळगावचा? नागपूरचा की मुंबईतलाच? की सगळेच या कामात गुंतले होते? २) तुम्ही अंगाला लावलेलं तेल कोणतं आहे? खोबरेल, बदामाचं, मोहरीचं की सुगंधी (थोड्या वेळाने वास उडून जाणारं) ३) आत्ताच तेल लावल्यावर दिवाळीला अभ्यंगस्नानाला कोणतं तेल लावणार आहात? ४) अंगाला तेल लावून दुसºयाच्या तावडीतून अलगद सुटून जाणं तुमच्यासारख्या नामी पहिलवानाला शोभतं का?५) तुम्ही आखाड्यात उतरूनही बराच वेळ झालाय. तुम्हाला आव्हान द्यायला कुणी उतरत नसल्यानं तेल जिरून गेलं असेल, नाही तर उडून गेलं असेल. पुन्हा तेल लावणार का?६) तुम्हालाच आव्हान द्यायला कुणी नाही, तर मग तुमच्या दिल्ली आखाड्यातले दोन दोन उस्ताद राज्यात शड्डू ठोकत का हिंडतायत? ७) या दोन उस्तादांना तेल लावायला तोलामोलाचं कोण शागीर्द जाणार आहे? त्यांना कोणतं तेल आवडतं?८) हे उस्ताद मोकळ्या असलेल्या आखाड्यात नेमकी कुणाशी कुस्ती खेळणार आहेत?९) तुम्ही कोणत्या प्रकारची कुस्ती खेळता? मॅटवरची की मातीतली? १०) तुम्ही तुमच्याच काही नामी पहिलवानांना ‘धोबीपछाड’ दिल्याचं समजलं, खरंय का ते?११) तुम्ही अंगाला तेल लावलंय, पण तिकडे तुमच्याच काही सहकाºयांना कुस्तीची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे चेहरे ‘एरंडेल तेल प्यायल्या’ सारखे झालेत, हे खरं का?१२) काही ठिकाणी तुमचे पहिलवान 'नुरा कुस्ती' खेळतायत, खरंय का ते?१३) आमचे नामी मल्ल तुमच्या आखाड्यात घेतल्यावर तुम्हाला आव्हान द्यायला मुळात येणार कोण?१४) मुळात तुम्ही आमच्या उस्तादांना त्यांच्या तोलामोलाचे मल्ल वाटत नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले आहे.१५) राज्यात ओला आणि सुका दुष्काळ असताना अंगाला असं तेल लावणं तुम्हाला शोभून दिसतं का?ता. क. : तुमचा तेल लावलेला एक फोटो आम्हाला अवश्य पाठवून देणे. आम्हाला तो पाहण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे.  (हसू आवरत नसल्यानं थांबतो.)  उत्तराच्या अपेक्षेत.                    आपला विश्वासू,                  सांगलीकर पहिलवान                    (इस्लामपूर आखाडा)(याला कारभारी पहिलवानांनी दिलेलं पत्रोत्तरही आमच्या हाती लागलंय, ते वाचा उद्याच्या अंकात)

- अभय नरहर जोशी - 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटील