मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना बहुमतात राज्यात सत्तेवर येईल असं चित्र दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात लोकांमधील वातावरण वेगळे आहे. उद्या आघाडीच्या बाजूने चांगला निकाल लागेल. २०१४ पेक्षा आघाडीच्या जागा जास्त जिंकून येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांसाठी निवडणूक एक ऊर्जा असते, निवडणुकीतल्या प्रचारातून वडिलांना बाहेर काढावं लागतं इतकं ते रमतात. महान योद्धा म्हणून निवडणुकीत शरद पवार लढले, साताऱ्यातील त्यांचे रुप पाहिलं तर एक आदर्श योद्धा काय असतो ते समजलं. मुलगी म्हणून अभिमान वाटला. निवडणुकीतला प्रत्येक उमेदवाराने कष्ट केलेत असं त्यांनी सांगितले.
तसेच लोकांमधलं जे वातावरण आहे, मूड होता. हे खूप वेगळं होतं. लोकांचा कल उद्याच कळेल. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचार केला. आमचे नेतेही विविध भागात प्रचार करत होते. शरद पवारांना मिळालेला प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. २०१४ ची राजकीय परिस्थिती वेगळी होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत वातावरण वेगळं आहे. सत्तेचा उन्माद भाजपाने केला. विरोधक दिलदार असायला हवा. सत्तेत राहून दानत असणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. सत्ता पचविता आली पाहिजे असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विविध चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढत आहे. उद्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान जागा टिकविणे आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणणे यासाठी भाजपाने प्रयत्न केले आहेत. तर युतीच्या माध्यमातून शिवसेनेनेही आमदारांची संख्या वाढविण्यासाठी कसरत केली आहे. त्यामुळे नेमक्या महायुतीला किती जागा मिळणार की महाआघाडी आपलं अस्तित्व टिकविणार हे २४ तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...
मोदी सरकारनं दिलं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; MSPमध्ये केली 'एवढी' वाढ
मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन
उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार
'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'