महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 07:06 PM2024-11-20T19:06:17+5:302024-11-20T19:06:38+5:30

एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

Maharashtra Exit Poll 2024 : Mahayuti clear majority in Maharashtra; Matrize exit poll predicts NDA 150-170 | महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज

Maharashtra Assembly Election Exit Poll 2024 Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. यानुसार, राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार
महाराष्ट्रात एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज Matrize एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150-170 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येणार असल्याचे सांगितले जात आहे. PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 137-157, महाविकास आघाडीला 126-146 आणि इतरांना 2-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर, चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलमध्येही महायुतीला बहुमत मिळणार असल्याचे सांगितले आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीला 152-160 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 130-138 जागा मिळतील असा अंदाज आहे.

एक्झिट पोल कधी-कधी चुकीचे सिद्ध झाले?
एक्झिट पोलचे निकाल कधी योग्य तर कधी चुकीचे ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले होते. सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही एक्झिट पोल तर एनडीएला 400 जागा मिळाल्याचे दाखवत होते. मात्र, निवडणुकीचे निकाल उलटे लागले. एनडीएला सरकार स्थापन करण्यात यश आले, मात्र त्यांना केवळ 292 जागा मिळाल्या. तर इंडिया अलायन्सने 232 जागा जिंकल्या.

त्याचप्रमाणे हरियाणातील जवळपास सर्वच एक्झिट पोल काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवत होते. मात्र निकाल लागताच राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. गेल्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील एक्झिट पोलही चुकीचे सिद्ध झाले होते. भाजपने तिन्ही राज्यात सत्ता मिळवली होती.
 

 

Web Title: Maharashtra Exit Poll 2024 : Mahayuti clear majority in Maharashtra; Matrize exit poll predicts NDA 150-170

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.