Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा 23 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या निकालांवर लागल्या आहेत. दरम्यान, आज मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली, ज्यात महायुतीला स्पष्ट बहूमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अशातच, राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असाही प्रश्न सर्वांच्या मनात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे जाहीर केले होते. पण, एका एक्झिट पोलनुसार, सर्वाधिक पसंतीचे मुख्यमंत्री कोण? हे समोर आले आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, 35.8 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची पहिली पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. त्यांना 21.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांना फक्त 11.7 टक्के लोकांची पसंती आहे. याशिवाय, अजित पवार यांना 2.3 टक्के आणि नाना पटोले यांना 1.3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर, इतरांना 27.2 टक्के लोकांनी पसंती दिली.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकारमहाराष्ट्रात एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज Matrize एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150-170 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येणार असल्याचे सांगितले जात आहे. PMARQ च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 137-157, महाविकास आघाडीला 126-146 आणि इतरांना 2-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर, चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलमध्येही महायुतीला बहुमत मिळणार असल्याचे सांगितले आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीला 152-160 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 130-138 जागा मिळतील असा अंदाज आहे.