शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
2
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
3
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
4
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
5
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
6
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
7
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
8
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
9
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
10
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
11
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
12
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
13
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
14
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
15
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
16
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
17
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
18
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
19
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
20
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा

Maharashtra Floods : क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:13 PM

धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचा धोका संभवतो. एक टीएमसी, क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. 

ठळक मुद्देमहापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू झाला.सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि  पूल बंद.राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत.

मुंबई - महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 19 जण सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि  पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.

राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत.  4,47,695 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या 32, एसडीआरफच्या 3, लष्कराच्या 21, नौदलाच्या 41, तटरक्षक दलाची 16 पथके कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे 40 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर 48 जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचा धोका संभवतो. एक टीएमसी, क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. 

टीएमसी (TMC) 

एक टीएमसी म्हणजे One Thousand Millions Cubic Feet आहे. म्हणजेच01 अब्ज इतके घन फूट असतं.

01 TMC = 28,316,846,592 ltrs.

क्युमेक (Cumec) 

एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक आहे. या प्रमाणात एक सेकंदात 1000 लिटर पाणी बाहेर पडते. 

01 CUMEC = 1000 Litres/Second

क्युसेक (Cusec) 

एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते. 

01 CUSEC = 28.317 Litres/Second

महाराष्ट्रातील मोठी धरणे 

उजनी - 117.27 TMC

कोयना - 105.27 TMC

जायकवाडी - 76.65 TMC

पेंच तोतलाडोह - 35.90 TMC

पूर्णा येलदरी - 28.56 TMc

पूर रेषा कशा आखतात?

पांढरी रेषा

धरणातून 30,000 क्युसेक पाणी सोडले तर त्या नदीपात्राची पाणीपातळी वाढते. पाणी पातळी जेथे पोहचते ती रेषा 'व्हाईट लाईन' अथवा 'पांढरी रेषा' म्हणून ओळखली जाते. 

निळी रेषा

धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा 'ब्लू लाईन' अथवा 'निळी रेषा' म्हणून ओळखली जाते. 

लाल रेषा

धरणातून 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले गेल्यावर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा 'रेड लाईन' अथवा 'लाल रेषा' म्हणून ओळखली जाते.  

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरSatara Floodसातारा पूरRainपाऊसDamधरणWaterपाणी