Coronavirus: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी; न्यायालयाकडून राज्य सरकारचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:35 AM2021-12-14T05:35:48+5:302021-12-14T05:36:16+5:30
Coronavirus In Maharashtra : उच्च न्यायालयाने या सर्व जनहित याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसंदर्भात कौतुकोद्गार काढले.
कोरोना स्थितीशी महाराष्ट्र सरकारने यशस्वीपणे सामना केला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कौतुक केले. पहिल्या लाटेवेळी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासंबंधित निर्देश देण्यात यावेत, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतल्याने, आता या याचिकांत निर्देश किंवा आदेश देण्यासारखे काही राहिले नसल्याने उच्च न्यायालयाने या सर्व जनहित याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसंदर्भात कौतुकोद्गार काढले.
कोरोनाशी संबंधित परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी होता, असे आम्ही ठामपणे म्हणू शकतो. कारण अनेक राज्यांत उच्च न्यायालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरू झालेला नाही. मात्र, महाराष्ट्रात कोरोना काळातही उच्च न्यायालय सुटी न घेता सुरू होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे साध्य झाले.
मुंबई उच्च न्यायालय