शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Maharashtra Government : महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनानंतर राऊतांचं सूचक ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 8:30 AM

राज्यातील सत्ता नाट्याचा नवा अंक सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला.

ठळक मुद्देराज्यातील सत्ता नाट्याचा नवा अंक सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला.शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. राऊत यांनी '162 आणि अधिक... वेट अँड वॉच' असं सूचक ट्विट केलं आहे.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या महाविकास आघाडीने सोमवारी मुंबईत 162 आमदारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह 162 आमदारांच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र राजभवनात सादर केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. 

संजय राऊत यांनी मंगळवारी (26 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून '162 आणि अधिक... वेट अँड वॉच' असं सूचक ट्विट केलं आहे. राज्यातील सत्ता नाट्याचा नवा अंक सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला. महाविकास आघाडीच्या 162 आमदारांची तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर ओळखपरेड करण्यात आली. तसेच संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला संविधानाच्या रक्षणासह मतदारसंघ आणि पक्षाशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ देण्यात आली. बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हा गोवा नाही, महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचे लादले तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा सज्जड दम खा. शरद पवार यांनी भाजपला दिला. तर कुणी आडवा आला तर त्याचे काय करायचे हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात हे पत्र सादर केले. या वेळी अशोक चव्हाण, खा. विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, के.पी. पाडवी आदी उपस्थित होते. 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली; परंतु पूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवली होती. आजदेखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरतील. त्यामुळे आम्ही आताच सरकार स्थापनेचा दावा करीत आहोत. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस व सहयोगी आणि अपक्ष सदस्य यांची सह्यांनिशी यादी सोबत जोडत आहोत. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तत्काळ पाचारण करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

शरद पवार यांनी भाजपसह अजित पवारांना इशारा दिला. ते म्हणाले, जाणीवपूर्वक काही गैरसमज पसरविले जात आहेत. अजित पवार यांच्यावर पक्षाने कारवाई केलेली आहे. व्हीपचा धाक दाखवून आमदारकी धोक्यात येईल अशी कोणी भीती घातली जात आहे. पण पदावरून दूर केलेल्या व्यक्तीला आता कोणताही अधिकार उरलेला नाही. त्यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. मी संसद, घटनातज्ज्ञ आणि अनेक निवृत्त वरिष्ठांकडून स्पष्टता घेतली आहे. त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करु नका. सगळी जबाबदारी मी व्यक्तीगतरित्या घ्यायला तयार आहे, अशा शब्दात पवार यांनी आमदारांना धीर दिला.

आम्ही आलोय, रस्ता मोकळा करा - ठाकरे

मी पुन्हा येणार असे मी म्हणणार नाही, पण आम्ही आलोय, आता रस्ता मोकळा करा, आणि हिंमत असेलच तर आमच्या वाटेत येऊन पहाच, मग कळेल आम्ही काय आहोत ते, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला. ते म्हणाले, आपली लढाई सत्तेसाठी नसून सत्यमेव जयतेसाठी आहे. आज हा उत्साह पाहूनही सत्तेला चिटकून बसलेल्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर त्यांचे दुर्देव. पण आता आम्हाला जेवढे अडवण्याचे काम कराल तेवढे आम्ही घट्ट होऊ हे लक्षात ठेवा. आम्ही केवळ दोन पाच वर्षासाठी एकत्र आलो नाहीत. तर पाचचा पाढा पूर्ण करण्यासाठी आलोय. ही ताकद आणि शक्ती अशीच जपून ठेवू असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे