Maharashtra Government : काँग्रेसकडून नाना पटोले यांना मिळणार विधानसभाध्यक्ष पद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 10:33 AM2019-11-30T10:33:08+5:302019-11-30T11:02:49+5:30

काँग्रेसकडून नाना पटोले यांना विधानसभाध्यक्ष पद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Maharashtra Government Balasaheb Thorat Nana Patole will be the Congress candidate for Speaker elections | Maharashtra Government : काँग्रेसकडून नाना पटोले यांना मिळणार विधानसभाध्यक्ष पद

Maharashtra Government : काँग्रेसकडून नाना पटोले यांना मिळणार विधानसभाध्यक्ष पद

Next
ठळक मुद्देकाँग्रेसकडून नाना पटोले यांना विधानसभाध्यक्ष पद मिळणार काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची शनिवारी (30 नोव्हेंबर) शक्तिपरीक्षा होणार आहे. सरकारतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. त्यासाठी विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. काँग्रेसकडूननाना पटोले यांना विधानसभाध्यक्ष पद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. नाना पटोले यांचं नाव असून ते आज अर्ज भरणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. 'काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे' असं थोरात यांनी म्हटलं आहे. 

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित झाले होते. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे व उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत काँग्रेसने अध्यक्षपदाची मागणी केली होती. त्यात आता बदल करणे योग्य होणार नाही, असे सांगून राष्ट्रवादीने अध्यक्षपद घेण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघांपैकी एकाचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जात होते. मात्र आता बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. 

महाविकासआघाडीचे सरकार पुढील 30 वर्षं टिकेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वामध्ये राज्यात एक सक्षम सरकार तयार होणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या भावना सगळ्यांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याची आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम हे सरकार करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी सांगितले आहे.

नाना पटोले हे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघातून निवडून आले होते. 2014 मध्ये नाना पटोल यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाचे राजेश काशिवार विजयी झाले होते. नाना पटोले यांना पुन्हा एकदा 2019 मध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याने साकोलीमध्ये काँग्रेसचे पारडे जड झाले. साकोली मतदारसंघात भाजपाचे परिणय फुके यांनी सुरुवातील आघाडी घेतली. मात्र, नंतर नाना पटोले यांनी त्यांच्यावर मात करीत विजय मिळवला. 
 

Web Title: Maharashtra Government Balasaheb Thorat Nana Patole will be the Congress candidate for Speaker elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.