शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

Maharashtra Government: फिर एक बार भाजपा सरकार?; सत्ता स्थापनेसाठी दोन स्पेशल प्लान तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 6:59 AM

सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या जोरदार हालचाली

मुंबई: शिवसेनेकडून दररोज होणारी टीका बाजूला ठेवून जुन्या मित्रपक्षाला पुन्हा जवळ आणण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असलेल्या आणि त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संपर्कात असलेल्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपानं हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे याचवेळी भाजपानं प्लान बीदेखील तयार ठेवला आहे. शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी भाजपानं सुरू केली असली तरी मुख्यमंत्रिपदाबद्दल तडजोड केली जाणार नाही, या भूमिकेवर भाजपा अद्यापही ठाम आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं याबद्दलची माहिती दिली. उद्या युतीचं सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा झाली तरी मुख्यमंत्रिपद सोडायचं नाही, असं भाजपानं ठरवलं आहे. हा मुद्दा केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नाही. आज शिवसेनेसमोर भाजप झुकला तर एनडीएतील इतर घटकपक्ष त्या-त्या राज्यांमध्ये भाजपाला अशाच पद्धतीनं सत्तेत वाटा मागतील. भाजपला ते परवडणारं नाही. मित्रपक्षांच्या प्रत्येक मागणीसमोर भाजप झुकणार नाही, असा संदेश महाराष्ट्राच्या निमित्तानं भाजपा एनडीएतील मित्रपक्षांना देऊ इच्छितो, असं या नेत्यानं सांगितलं. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं सरकार स्थापन होणार नसेल आणि शिवसेना भाजपासोबत येण्यास तयार असेल तर शिवसेनेला सन्मानानं सोबत घेण्याची आमची तयारी असेल. महाशिवआघाडीबाबत बरेच पुढे निघून गेल्यानंतर यू टर्न घेत भाजपाबरोबर जायचं असेल तर त्यासाठी काही कारणं शिवसेनेला द्यावी लागतील. अशावेळी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेच्या बचावासाठी समोर केला जाईल. याशिवाय बचावाचे काही मुद्दे आम्हीदेखील सुचवू, अशी माहिती या नेत्यानं दिली. भाजपानं सत्ता स्थापनेसाठी प्लान बीदेखील तयार ठेवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची भूमिका असेल. भाजपाचे 105 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यांचं संख्याबळ 159 होतं. याशिवाय भाजपाला लहान पक्ष व अपक्ष अशा 14 आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ 173 होतं. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे 54 सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात 234 सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला 117 आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे 119 आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीनं राष्ट्रवादीनं 2014 मध्ये भाजपाला मदत दिली होती. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली होती. आताही त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस