बहुमत तर सिद्ध केलं, पण...; माकडांचा फोटो टाकून नितेश राणेंकडून महाविकासआघाडीची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 11:40 AM2019-12-01T11:40:54+5:302019-12-01T12:02:56+5:30
महाविकासआघाडी सरकारवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकासआघाडी सरकारने शनिवारी (30 नोव्हेंबर) विधानसभेत 169 आमदारांच्या पाठिंब्यावर आपले स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. भाजपाने मात्र आक्षेप घेऊन मतदानाआधी सभात्याग केला. न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानाचे प्रक्षेपण करण्यात आले. महाविकासआघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं. बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहीले. महाविकास आघाडी सरकारवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. एका गाडीला माकडांनी वेढा घातल्याचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत अनेक माकडं आहेत. त्यातील काही माकडं गाडीचा दरवाजा उघडून चालकाच्या जागी, काही गाडीत तर काही गाडीच्या टपावर बसलेली दिसत आहेत. या फोटोला एक कॅप्शन देण्यात आले आहे. 'लेकिन एक को भी चलाना नही आता' असे कॅप्शन दिले आहे. सरकारवर टीका करणारं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
😀😀😀 pic.twitter.com/Gp1XHl5tYO
— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2019
भाजपा शिवसेनेवर वारंवार टीका करत आहेत. भाजपाचे नेते नितेश राणेंनीही ट्विट करून याआधी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मते, स्थानिक म्हणजे मराठी माणूस (भूमिपुत्र) असा होता. परंतु उद्धव ठाकरेंनी स्थानिकांची नवी व्याख्या शोधून काढली आहे?, असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
परळीतील पराभव पंकजा मुंडेंच्या जिव्हारी; पुढे काय करायचं? 12 डिसेंबर होणार मोठा निर्णय? @Pankajamunde@BJP4Maharashtra#Maharashtrahttps://t.co/GIzzlfSZVI
— Lokmat (@MiLOKMAT) December 1, 2019
दोन दिवसांपूर्वी देखील नितेश राणे यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर टीका केली होती. नितेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. मला अभिमान आहे की ज्या पक्षाकडून मी आमदारकीची शपथ घेतलेली आहे, त्या पक्षानं सत्तेसाठी लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हतं, तेव्हा आमचे नेते फडणवीसांनी सांगितलं की, सत्ता स्थापन करू शकत नाही. त्याच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग घेतली नाही. लोकांचे तळवे चाटले नाहीत म्हणून मला अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड; कथोरेंनी अर्ज मागे घेतला @NANA_PATOLE@BJP4Maharashtra#MaharashtraGovtFormationhttps://t.co/2Lj0QVdmga
— Lokmat (@MiLOKMAT) December 1, 2019
विधिमंडळ आणि मुख्यमंत्रीची खुर्ची थोडी वेगळी आहे. बंगल्यात बसून आदेश देणं सोपं असतं. विधिमंडळात प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि ती अधिकृत द्यावी लागतात. सभागृहात काय होणार आहे लवकरच कळेल. पहिल्या दिवसापासूनच आमचा गोळा बारूद तयार आहे. आता फक्त मैदानात या, असं आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिलं.