शहरं
Join us  
Trending Stories
1
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
2
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
3
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
4
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
5
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
6
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
7
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
8
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
9
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
10
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
11
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
12
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
13
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
14
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
15
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
16
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
17
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
18
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
19
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
20
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण

आशा सेविकांना अनुदान, मेंढपाळांच्या खात्यात पैसे जमा होणार; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 7:04 PM

Maharashtra Government Cabinet Meeting Decision : या बैठकीत महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले.  

मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. तर राज्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले.  

यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अंबडला एमआयडीसी स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरणही ठरवले आहे. तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.तसेच मेंढपाळ लाभार्थींना त्यांची रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा शासनाने घेतला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे सहा निर्णय...

१) आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख (सार्वजनिक आरोग्य)राज्यातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे,   ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखांची मदत तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखांची मदत राज्य सरकार करणार आहे,  अशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदनाच्या संदर्भातला हा महत्वाचा निर्णय आहे. राज्यात एकूण ७५ हजार ५६८ आशा स्वयंसेवीका कार्यरत आहेत.  

२) राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणारराज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना २०१७ वर्षापासून सुरु होती.  या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली.  या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या २९ कोटी ५५ लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल.  पशुधन खरेदीच्या बाबतीत ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल.  तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील. 

३) दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू (सामान्य प्रशासन विभाग)राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल.  ३० जून २०१६ पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल.  पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी ३० जून २०१६ नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पद संख्येनुसार आणि २० एप्रिल २०१३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणणा करावी.  तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरशी नुसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असे देखील ठरले. 

४) शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार (मदत व पुनर्वसन विभाग)शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही प्रणाली सुरु होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल. १ जुलै २०२४ रोजी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणांप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय झाला होता.

५) बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका (सामान्य प्रशासन विभाग)बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. माझगाव येथील पारिजात इमारतीत १६, केदार इमारतीतील ३ अशा १९ न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने ३२ अशा ५१ सदनिका ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात येतील. एका सदनिकेचे १ महिन्याचे कमाल भाडे १ लाख २० हजार असून त्यामुळे ५१ सदनिकेसाठी एका वर्षाच्या ७ कोटी ३४ लाख ४० हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली.

६) नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एमआयडीसीसाठी १६ हेक्टर शासकीय जमीन (महसूल विभाग)नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे एमआयडीसीला विस्तारीकरणासाठी १६ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या जमिनीची किंमत २४ कोटी २ लाख ४० हजार इतकी असून ती विनामुल्य एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात येईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMantralayaमंत्रालय