शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Maharashtra Government: ...त्यांना जी कारवाई करायचीय त्याला सामोरं जाण्यास तयार, एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:41 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव आज 169 मतांनी विधानसभेत जिंकला असून,  हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांची याची घोषणा केली.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव आज 169 मतांनी विधानसभेत जिंकला असून,  हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांची याची घोषणा केली. या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी 4 आमदार तटस्थ राहिले. तर भाजपाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुतेक आमदारांनी सभागृहात मनोगत व्यक्त केलं. विशेष म्हणजे राज्यपालांनी शपथविधीदरम्यान काही गोष्टींवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यालाच आज एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.शिवतीर्थावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आदरणीय बाळासाहेबांच्या स्मारकासमोर, लाखो महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर या सरकारचा शपथविधी झालेला आहे.  राज्यपालांनी शपथ घेण्यावर आक्षेप घेतला. काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले सगळेच आणि मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून शपथ घेतली आहे. बाळासाहेबांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ किंबहुना कुठलं कामकाज आम्ही करत नाही.कारण बाळासाहेबांमुळे आम्ही या सभागृहात आलो, राज्यपालांना जी काही कार्यवाही करायची असेल, त्याला सामोरं जाण्याची आपली तयारी असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. आम्हाला 169 मतांचं बहुमत मिळालं आहे, त्यामुळे विरोधकांनी बहुमतासमोर थांबायला हवं होतं. उद्धव ठाकरेंचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, असंही ते म्हणाले आहेत. आता विश्वासदर्शक ठरावाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येणार आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019