Maharashtra Government Formation Live: राज्यपालांकडून राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचं निमंत्रण
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 08:07 AM2019-11-11T08:07:13+5:302019-11-11T20:41:13+5:30
राज्यातील सत्तास्थापनेचा वेगळाचा फॉर्म्युला पाहायला मिळत आहे.
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भाजपाने सत्तास्थापन करण्यात असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असणारी शिवसेना एनडीएतून बाहेर पडत नाही तोवर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकत नाही, असं आघाडीने सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत आज मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.
राज्यातील सत्तास्थापनेचा वेगळाचा फॉर्म्युला पाहायला मिळत आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसून येतंय. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून गतीमान हालचाली सुरू आहेत.
LIVE
07:11 PM
शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा
Aaditya Thackeray, Eknath Shinde and other Shiv Sena leaders meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan in Mumbai. #Maharashtrapic.twitter.com/EKWeO8URAz
— ANI (@ANI) November 11, 2019
07:00 PM
17 नोेव्हेंबरला शिवसेनेचा शपथविधी? शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंची १७ नोव्हेंबरला पुण्यतिथी
06:30 PM
काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र शिवसेना नेते अनिल परब यांनी टिळक भवनमधून घेतलं
06:11 PM
नगरविकाससाठी अजित पवार आग्रही- सूत्र
06:10 PM
राष्ट्रवादीला गृह खातं मिळाल्यास जयंत पाटील यांना दिलं जाण्याची शक्यता- सूत्र
06:10 PM
गृह खातं आणि नगरविकाससाठी राष्ट्रवादी आग्रही- सूत्र
06:09 PM
अर्थ आणि नियोजन खाते सुभाष देसाईंना देणार- सूत्र
06:09 PM
उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे दोघांपैकी एकजण मुख्यमंत्री होण्याची शक्यता
06:08 PM
12 काँग्रेस, 12 राष्ट्रवादी आणि 18 मंत्रीपदे शिवसेनेला असा काँग्रेसकडे प्रस्ताव
06:07 PM
राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला काँग्रेस तयार
06:07 PM
दोन्ही काँग्रेसची पत्रे आदित्य ठाकरेंच्या ताब्यात
05:47 PM
सोनिया गांधींची काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा सुरू
Sources: Congress Interim President Sonia Gandhi speaks to some party MLAs from Maharashtra who are lodged in a Jaipur hotel. pic.twitter.com/cHqoUaxDFe
— ANI (@ANI) November 11, 2019
05:34 PM
राष्ट्रवादीकडून समर्थनाचं पत्र तयार; काँग्रेसच्या बैठकीकडे लक्ष
05:29 PM
शिवसेना नेते एकनाथ शिंदे थोड्याच वेळात राजभवनवर जाणार
05:20 PM
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल अनुकूल नाही
05:02 PM
शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस हायकमांड सकारात्मक?; सर्व आमदारांशी फोनवरून चर्चा करणार
04:37 PM
उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर
04:17 PM
काँग्रेस शिवसेनेला दिलेला पाठिंबा ५ वर्ष कायम ठेवेल, ही अपेक्षा- देवेगौडा
Janata Dal (Secular) Chief and Former Prime Minister HD Deve Gowda: If Congress gives support to Shiv Sena, they should not disturb it for next 5 years. Then only people will trust Congress. pic.twitter.com/eQY1Tbr1c8
— ANI (@ANI) November 11, 2019
04:16 PM
शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल
Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut admitted at Lilavati hospital. More details awaited. (File Pic) pic.twitter.com/Y9vDO4GdUa
— ANI (@ANI) November 11, 2019
02:47 PM
शिवसेना पाठिंब्याला सोनियांचा विरोध, राज्यातील 6 काँग्रेस नेते दिल्लीला
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा शिवसेना पाठिंब्याला विरोध असल्याची माहिती आहे. सोनिया यांच्यासह राहुल आणि प्रियंका यांचाही या पाठिंब्याला विरोध असल्याचे समजते. सध्या, महाराष्ट्रातून 6 नेते दिल्लीत पोहोचले असून सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यामध्ये, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वटेट्टवार या नेत्यांचा समावेश आहे.
01:07 PM
उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, मातोश्रीतून रवाना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी मातोश्रीतून निघाले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेही या भेटीत हजर असणार आहेत.
12:29 PM
काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार, सायंकाळी 4 नंतर निर्णय घोषित होणार
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका दर्शवली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सांयकाळी 4 वाजता बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच, काँग्रेसची भूमिका जाहीर करण्यात येईल, असे खर्गे यांनी सांगितलं. तर, काँग्रेसच्या निर्णयानंतरच आमचीही भूमिका जाहीर करू, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
11:52 AM
युती टिकणार की संपणार, आज संध्याकाळी घोषणा होणार
युती टिकणार की संपणार, संध्याकाळी 7.30 वाजता ठरणार असल्याचं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. याबाबत सायंकाळी 7.30 वाजता भाजपा आपली भूमिका जाहीर करणार आहे.
11:43 AM
शिवसेना राज्यपालांना भेटणार, आमदारांच्या सह्यांचं पत्र सोपवणार
शिवसेनेचं शिष्टमंडळ घेणार दुपारी राज्यपालांची भेट; समर्थक आमदारांच्या सहीचं पत्र सोपविणार @ShivSenahttps://t.co/BVrVnvV4HA
— Lokmat (@MiLOKMAT) November 11, 2019
10:40 AM
'राष्ट्रपतींकडून भाजपाला 72 तर शिवसेनेला फक्त 24 तासांची मुदत'
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींकडून आम्हाला सत्ता स्थापन करण्यास कमी कालावधी मिळाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी भाजपाला 72 तासांचा अवधी दिला होता. पण, शिवसेनेला केवळ 24 तासात सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक राज्यातील परिस्थिती पाहता, आम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही, असे म्हणत राऊत यांनी दुजाभाव झाल्याकडे लक्ष वेधलं.
10:31 AM
संजय राऊतांकडून मुख्यमंत्री टार्गेट, अहंकारामुळेच भाजपा विरोधात
शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा @rautsanjay61@NCPspeaks@ShivSena@BJP4Maharashtrahttps://t.co/y9C1PyvEbB
— Lokmat (@MiLOKMAT) November 11, 2019
10:30 AM
राष्ट्रवादीची बैठक होणार, त्यानंतरच पाठिंब्याचा निर्णय ठरणार
शिवसेनाला पाठिंबा देणार का?, राष्ट्रवादीच्या उत्तरातून 'सस्पेन्स' कायम https://t.co/KcbGiwh0hr
— Lokmat (@MiLOKMAT) November 11, 2019
09:54 AM
'भाजपाकडूनच जनतेचा अपमान', संजय राऊतांकडून मुख्यमंत्री टार्गेट
भाजपाकडून महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला जात आहे. आम्ही विरोधी पक्षात बसू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. भाजपाकडूनच 50-50 फॉर्म्युल्यावर कटिबद्दता पाळली जात नाही. भाजपमध्ये हा अहंकार असून महाराष्ट्राच्या जनेतचा हा अपमान असल्याचं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
09:21 AM
सेनेकडून सत्तास्थापनेला वेग, भाजपाने बोलावली बैठक
शिवसेनकडून सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना देण्यात येणाऱ्या पत्रासाठी आमदारांच्या सह्या घेण्याचं काम सुरू आहे. तर, दुसरीकडे भाजपानेही कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे.
08:12 AM
खासदार संजय राऊतांकडून सत्ता-स्थापनेचे संकेत
रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 11, 2019