नवी दिल्ली: राज्यपालांना रातोरात हटवलेली राष्ट्रपती राजवट आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ यावरुन आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. विधानसभेत आजच बहुमत चाचणी घ्या, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी आणि शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तर ठरलेल्या वेळीच बहुमत चाचणी होऊ द्या, अशी मागणी भाजपा आणि सरकारच्या बाजूनं करण्यात आली. या प्रकरणी उद्या सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. Live Updates:- सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी १०.३० वाजता अंतिम सुनावणी- आम्ही पण बहुमत चाचणीत हरायला तयार; पण बहुमत चाचणी ठरलेल्या तारखेलाच होऊ दे- तुषार मेहता- आजच बहुमत चाचणी घ्या; आम्ही याचिका मागे घेतो- अभिषेक मनु सिंघवी- तीन पक्षांना एक वकील निश्चित करता आला नाही; तुषार मेहतांच्या युक्तिवादानंतर कोर्टात हशा- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिज्ञापत्रं न्यायालयानं स्वीकारली नाहीत- आम्ही बहुमत चाचणीत पराभूत झालो तरी चालेल, पण बहुमत चाचणी आजच होऊ द्या- अभिषेक मनु सिंघवी- ते ५४ आमदारांचं पत्र नेतानिवडीसाठी; भाजपाच्या पाठिंब्यासाठी नाही- अभिषेक मनु सिंघवी- राष्ट्रवादीकडून नवीन पत्र कोर्टात सादर- हंगामी विधानसभा अध्यक्ष नेमा.. आजच बहुमत चाचणी घ्या- अभिषेक मनु सिंघवी- सगळं काही रात्रीच्या अंधारात घडलं.. आता बहुमत चाचणी दिवसाउजेडी घ्या- कपिल सिब्बल- ५४ आमदारांच्या सह्या असतीलही, पण भाजपाला पाठिंब्याचा उल्लेख नाही; राष्ट्रवादीचा युक्तिवाद- राज्यपालांच्या निर्णयावर बोलायचं नाही.. पण बहुमत चाचणी लवकर घ्या- सिंघवी- एका कारणासाठी घेतलेलं पत्र अजित पवारांनी दुसऱ्या कारणासाठी वापरलं; काँग्रेस, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद- राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचं पत्र अजित पवारांकडे होतं.. म्हणजे अजित पवारच राष्ट्रवादी; अजित पवारांचे वकील मणिंदर सिंग यांचा युक्तिवाद- रात्री नेमकं असं काय घडलं की पहाटे राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली?- कपिल सिब्बल- आणीबाणीच्या परिस्थितीत असे निर्णय राज्यपाल घेतात- कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद- कित्येक दिवस संयमानं काम करणारे राज्यपाल मध्यरात्री इतके सक्रीय कसे काय झाले- कपिल सिब्बल- काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्ता स्थापन करण्याआधीच कशी काय राष्ट्रपती राजवट उठवली जाते?- कपिल सिब्बल- अशी काय राष्ट्रीय आपत्ती कोसळली होती की रातोरात राष्ट्रपती राजवट उठवली? शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा सवाल- राज्यपाल बघून घेतील.. यात न्यायालयानं लक्ष घालू नये- तुषार मेहता, मुकूल रोहतगी यांची विनंती- विरोधकांना त्यांचे आमदार पळून जातील याची भीती वाटते.. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय.. असंच सुरू राहिल्यास विधानसभेचं कामकाज कसं चालणार- तुषार मेहता- 'एक पवार त्यांच्याकडे, एक आमच्याकडे; त्यांच्या कौटुंबिक वादाशी देणंघेणं नाही'- भाजपाचे वकील मुकूल रोहतगी- मी देवेंद्र फडणवीस.. भाजपाचा विधिमंडळ गटनेता आहे.. माझ्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा आहे..; तुषार मेहतांनी वाचून दाखवलं फडणवीसांनी राज्यपालांना दिलेलं पत्र- राज्यपालांनी योग्य तेच केलं.. त्यांना काय समिती बसवायली होती का? मेहतांचा सवाल- अजित पवारांचं पत्र राज्यपालांना मिळालं.. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली..- तुषार मेहता- मी अजित पवार.. राष्ट्रवादीचा गटनेता आहे. माझ्याकडे सर्व ५४ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे- तुषार मेहता- अजित पवारांनी २२ नोव्हेंबरला पत्र दिलं. त्यावर ५४ आमदारांच्या सह्या होत्या- तुषार मेहता- बहुमतासाठी राज्यपालांनी तीन पक्षांना संधी दिली- तुषार मेहता- ९ नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी शिवसेना-भाजपाची सत्ता स्थापनेसाठी वाट पाहिली- महाधिवक्ता तुषार मेहता
LIVE: सत्तासंघर्ष कायम; सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:58 AM