काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावर सोडणार 'पाणी', 'हे' नेते होणार मंत्री- सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:37 PM2019-11-27T13:37:36+5:302019-11-27T14:00:45+5:30

राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचं सरकार कोसळलं.

maharashtra government formation shivsena may get 11 cabinet 4 state minister ncp | काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावर सोडणार 'पाणी', 'हे' नेते होणार मंत्री- सूत्र

काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावर सोडणार 'पाणी', 'हे' नेते होणार मंत्री- सूत्र

googlenewsNext

मुंबई- राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचं सरकार कोसळलं. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरू केली असून, किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांची एकमत झाल्याचीही चर्चा आहे.

या किमान समान कार्यक्रमांतर्गत काँग्रेसला 13 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. यात 9 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपद येऊ शकतात. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गृह आणि महसूल विभागासंदर्भात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावर पाणी सोडण्यास तयार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काय मिळणार?
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादीला गृह मंत्रालय मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसला महसूल खातं देण्यासंदर्भात ठरल्याचंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला आहे. 

या नेत्यांना मिळणार मंत्रिपद?
Indian Expressच्या वृत्तानुसार, शिवसेनेचे 8 आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 9-9 नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील, सुनील केदार मंत्री बनवलं जाऊ शकतं. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांना मंत्री बनवलं जाऊ शकतं.  
काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. मंत्रिपदांच्या वाटपासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे. कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद आणि राज्यमंत्रिपद मिळणार आहे, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे. 

आमदार कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष 
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयांच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली आहे. यामध्ये यादीमध्ये भाजपाच्या तीन, राष्ट्रवादीच्या एका आणि काँग्रेसच्या दोन आमदारांचा समावेश करण्यात आला होता. यातून भाजपाच्याकालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 

Web Title: maharashtra government formation shivsena may get 11 cabinet 4 state minister ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.