शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावर सोडणार 'पाणी', 'हे' नेते होणार मंत्री- सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:37 PM

राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचं सरकार कोसळलं.

मुंबई- राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचं सरकार कोसळलं. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरू केली असून, किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांची एकमत झाल्याचीही चर्चा आहे.या किमान समान कार्यक्रमांतर्गत काँग्रेसला 13 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. यात 9 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपद येऊ शकतात. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गृह आणि महसूल विभागासंदर्भात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावर पाणी सोडण्यास तयार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काय मिळणार?शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादीला गृह मंत्रालय मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसला महसूल खातं देण्यासंदर्भात ठरल्याचंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला आहे. या नेत्यांना मिळणार मंत्रिपद?Indian Expressच्या वृत्तानुसार, शिवसेनेचे 8 आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 9-9 नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील, सुनील केदार मंत्री बनवलं जाऊ शकतं. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांना मंत्री बनवलं जाऊ शकतं.  काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. मंत्रिपदांच्या वाटपासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे. कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद आणि राज्यमंत्रिपद मिळणार आहे, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे. आमदार कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयांच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली आहे. यामध्ये यादीमध्ये भाजपाच्या तीन, राष्ट्रवादीच्या एका आणि काँग्रेसच्या दोन आमदारांचा समावेश करण्यात आला होता. यातून भाजपाच्याकालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे