शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 5:07 PM

"सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत"

ठळक मुद्देसीमेवर अडवली जातायत प्राणी घेऊन येणारी वाहने'सरकारने मुस्लीम नेत्यांचेही ऐकले नाही''इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही'

मुंबई - महाविकास अघाडी सरकारने आमचा अपेक्षा भंग केला आहे. बकरी ईद निमित्त पशूंची कुर्बानी देण्यात सरकार अडथळे आणत आहे. हे थांबले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा मुंबईतील मुस्लीम कार्यकर्ते आणि काही मौलानांनी दिला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर मौलानांनी निशाणा साधला आहे. "सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत," असे मोलानांनी म्हटले आहे.

सीमेवर अडवली जातायत प्राणी घेऊन येणारी वाहने - संबंधित मोलानांनी आपोर केला आहे, की दुसऱ्या राज्यांतून बकरे घेऊन येणारी वाहने सीमेवर अडवले जात आहेत. त्यांना चेकपोस्टवरून आत येण्यापासून रोखले जात आहे. पोलीस एका वेळी केवळ दोनच बकरे नेण्यास परवानगी देत आहेत. यामुळे संबंधित लोकांना नाहक त्रास होत आहेत.

'सरकारने मुस्लीम नेत्यांचेही ऐकले नाही' -ऑल इंडिया उलेमा काउंसिलचे मौलाना मसूद दरयाबादी म्हणाले, 'आम्हाला आमचे मुस्लीम आमदार आणि मंत्र्यांवर विश्वास होता. आम्हाला आशा होती, की ते सरकारला सुधारित नियमावली जारी करायला सांगतील. त्यांनी बरेच प्रयत्न केले. एवढेच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यात हस्तक्षेप केला. मात्र तरीही त्याचा उपयोग झाला नाही.'

'इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही' -हांडीवाली मशिदीचे इमाम मौलाना ऐजाज कश्मीर यांनी म्हटले आहे, की पोलिसांनी जेथे वाहने अडवली, तेथे त्यांचे मुस्लीम सहकारी गेलेदेखील, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. माजी मंत्री नसीम खान म्हणाले, इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही. ऑनलाइन बकरे विकत घेण्यातही अडचणी येत आहेत. 

'देवनारच्या कत्तलखान्यात रोज म्हशी कापल्या जातात. पण कुर्बानीसाठी म्हशी कापण्यास परवानगी नाही. हा कुठला नियम आहे, असा सवाल अमन कमिटीचे प्रमुख फरीद शेख यांनी केला. 'यापूर्वीचे फडणवीस सरकार प्रत्येक सणापूर्वी मुस्लिम एनजीओ, मौलाना आणि आमदारांची बैठक घ्यायचे. ठाकरे सरकारने, अशी कुठलीही बैठक घेतलेली नाही,' असेही शेख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदBakri Idबकरी ईदMuslimमुस्लीमUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र