शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maharashtra Government: राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 9:00 AM

विधान भवन परिसरात अजित पवारांचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत

मुंबई: मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. माझे सर्व सहकारी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर ते आमदारकीची शपथ घेण्यासाठी विधानभवन परिसरात पोहोचले. काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर अजित पवार यांनी रात्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांच्या स्वागताला दारातच उभ्या होत्या. त्यानंतर आज सकाळी विधान भवनात दाखल होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी योग्य वेळी बोलेन. मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असं म्हणत अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सर्व सहकारी सोबत आहेत. त्यामुळे गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून तसूभरही तथ्य नसलेल्या बातम्या दिल्या जात आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी प्रसारमाध्यमांबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या भेटीवरदेखील भाष्य केलं. पवार साहेब माझे नेते आहेत आणि पुढेही राहतील. मी आधीदेखील ही गोष्ट शब्द केली आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार