मुंबई : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शाळा १७ ऑगस्टपासून पुन्हा उघडतील. ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रत्येक वर्गात कमाल २० विद्यार्थ्यांनाच परवानगी दिली आहे. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांत होतील.शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केल्या. चौथीपर्यंतच्या शाळा मात्र बंद राहतील. ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग आधीपासूनच सुरू आहेत.मास्क, शारीरिक अंतर, सॅनिटायझर, शाळांचे निर्जंतुकीकरण याच्या सूचना जारी केल्या आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड स्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत. सरकारने २ ऑगस्टला जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीशाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. वॉर्ड ऑफिसर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व शिक्षणाधिकारी यात असतील.विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नाही. पूर्णपणे पालकांच्या समंतीवर उपस्थिती अवलंबून असेल.शिक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू नये.
एका वर्गात २० विद्यार्थ्यांनाच परवानगी; १७ ऑगस्टपासून वाजणार घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 6:59 AM