मुंबई : महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ ते रद्द केले, असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चीनच्या हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी सामंजस्य करार केला आहे.
एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!
राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणे येथे, हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीनही कंपन्यांनी प्रत्येकी 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. एकूण 5 हजार 20 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही देसाई यांनी म्हटले आहे.
फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यांत झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांचे संबंध जबरदस्त ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर बंधी घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यातच, महाराष्ट्र सरकारनेही चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द केल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, देसाई यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट
देशभरात चिनी वस्तूंविरोधात लाट -चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले आहे. आता चीन सीमेवरही कुरापती काढत आहे. यामुळे संपूर्ण देशभरातच चिनी वस्तूंविरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. देशभरांतील बाजारपेठांत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा होतांना दिसत आहे.
चीनला घेरण्याची पूर्ण तयारी -गलवानमधील हिंसक चकमकीनंतर भारतचीनला घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. भारताने आपले शक्तीशाली, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सु-सज्ज आणि अचूक निशाणा असणारे, मिराज-2000 आणि सुखोई-30 सारखी लढाऊ विमानं, तसेच अपाचे आणि चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स चीनच्या रोखानं एलएसीवर तैनात केली आहेत. तर दुसरीकडे चीनही त्यांच्या हद्दीत युद्धाची तयारी करताना दिसत आहे. तेही सीमेजवळ सान्याची आणि युद्ध सामग्रीची जमवाजमव करत आहेत.
गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले