Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:42 PM2019-11-25T14:42:13+5:302019-11-25T14:48:08+5:30

राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Maharashtra Government mla Anil Patil daulat daroda brought to Mumbai from Delhi by NCP leaders | Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले!

Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले!

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहणारे १३ पैकी १२ आमदार स्वगृही परतले आहेत. यापैकी दौलत दरोडा आणि अनिल पाटील यांनी त्यांची आपबिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली. आम्ही दोन दिवसांपासून गायब होतो, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला फुटीर आमदार म्हटलं जातं आहे. मात्र आम्ही शरद पवारांसोबत आहोत आणि यापुढेही कायम राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

दौलत दरोडा आणि अनिल पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शनिवारपासून त्यांच्यासोबत नेमकं काय काय घडलं, याची माहिती दिली. 'शनिवारी अजित पवार यांनी आम्हाला बोलावलं होतं. ते आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यांनी आम्हाला आदेश दिला की सकाळी ७ वाजता भेटायचं आहे. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे गेलो. त्याठिकाणी शपथविधी आटोपला. राष्ट्रवादी आणि भाजपाचं सरकार स्थापन होऊ शकतं, असा संदेश आम्हाला आला होता. बाकीचे आमदार नंतर येतील. आता आपण सगळ्यांनी निघायचं आहे, असा निरोप आम्हाला मिळाला होता. त्यामुळे आम्ही राजभवनात शपथविधीसाठी गेलो', असं अनिल पाटील यांनी सांगितलं. 




शपथविधी आटोपल्यानंतर आम्हाला दिल्लीला नेण्यात आलं. मात्र संध्याकाळी आम्हाला प्रसिद्धीमाध्यमांकडून काही गोष्टींची माहिती समजली, असं पाटील म्हणाले. 'माध्यमांमधील बातम्या पाहून आम्ही शरद पवारांना फोन केला. आपल्याला काँग्रेस, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायची आहे. पक्ष त्यावर ठाम आहे, असं शरद पवार यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर आम्ही त्यांना आमची परिस्थिती सांगितली आणि सुटकेची व्यवस्था करण्याची विनंती केली,' असं पाटील यांनी म्हटलं. 




दिल्लीतून निघताना बऱ्याच अडचणी आल्या. आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तिथे भाजपाचे १००-२०० कार्यकर्ते होते. पोलिसांच्या गाड्या होत्या. साध्या वेशातले पोलीसदेखील होते. त्यामुळे आम्ही घाबरलो. सुटका कशी होणार हा प्रश्न पडला होता. पण पवारांनी आमची तिथून सुटका केली, अशा शब्दांत पाटील यांनी त्यांची आपबिती सांगितली.

Web Title: Maharashtra Government mla Anil Patil daulat daroda brought to Mumbai from Delhi by NCP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.