Maharashtra Government: अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले; नेमकी कोणाची भेट घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 08:18 AM2019-11-26T08:18:14+5:302019-11-26T08:40:14+5:30

अजित पवारांच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

Maharashtra Government ncp rebel leader ajit pawar reaches trident hotel | Maharashtra Government: अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले; नेमकी कोणाची भेट घेणार?

Maharashtra Government: अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले; नेमकी कोणाची भेट घेणार?

Next

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. अजित पवार हॉटेलमध्ये कोणाची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र राज्यात सध्या सुरू असलेला संघर्ष पाहता अजित पवार यांच्या हालचालींकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अजित पवारांची समजूत काढण्यासाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचा एखादा वरिष्ठ नेता येऊ शकतो.  

आज सकाळी अजित पवार त्यांच्या प्रेम कोर्ट निवासस्थानाहून निघाले. थोड्याच वेळात ते ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले. अजित पवार यांची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. ते ट्रायडंटमध्ये एकटेच पोहोचले. सध्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांनी अजित पवारांची मनधरणीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर भेटीगाठींसाठी अजित पवार ट्रायडंटला पोहोचले का, याची चर्चा सुरू आहे.

ट्रायडंटवरुन अजित पवार पोलीस जिमखान्यात जाणार आहेत. तिथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना ते श्रद्धांजली अर्पित करतील. मात्र त्याआधी अजित पवार ट्रायडंटमध्ये पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. जवळपास अर्धा तास अजित पवार ट्रायडंटमध्ये आहेत. काल सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वपूर्ण सुनावणी होती. त्याआधी छगन भुजबळ यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. आज न्यायालयात अंतिम सुनावणी आहे. त्यामध्ये बहुमत चाचणी कधी घ्यायची याचा निर्णय होऊ शकतो. 
 

Web Title: Maharashtra Government ncp rebel leader ajit pawar reaches trident hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.