मुंबई : बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्याविरोधात आज 1 नोव्हेंबरला काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. यावेळी सीमा संघर्ष समन्वय समिती आणि मराठी संघटनेच्या वतीने करी रोड नाका येथे कर्नाटक सरकारविरोधात काळे झेंडे दाखविण्यात आले.
यावेळी जमलेल्या मराठी बांधवांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देतानाच कर्नाटक सरकारकडून सतत होणाऱ्या अन्यायावर महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून ताबडतोब सीमाप्रश्न निकालात काढावा, अशी मागणीही करण्यात आली.