शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Maharashtra Government: अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करणार का?; शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:22 AM

शरद पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका

सातारा: महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं. हकालपट्टीचा निर्णय पक्षाकडून घेतला जात असतो. हा निर्णय एक व्यक्ती घेत नाही, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. एखाद्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करायची का, याचा निर्णय एक व्यक्ती घेत नाही. याबद्दलचा निर्णय पक्ष घेईल. अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मात्र त्यांची निवड वैध आहे का प्रश्न आहे. कारण बहुमत नसतानाही भाजपानं सरकार स्थापन केलं आहे, असा तांत्रिक मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला. अजित पवार भाजपासोबत गेले आहेत. तो त्यांचा निर्णय आहे. पक्ष त्यांच्या सोबत नाही, या भूमिकेचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला. अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवार कराडमधल्या प्रीतीसंगमावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती पदांच्या गैरवापरावरुन भाजपाला लक्ष्य केलं. सर्व संकेतांना हरताळ फासण्याचं काम राज्यपालांकडून सुरू आहे. केंद्र सरकारकडून मनमानी कारभार चालला आहे, असं शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस