उत्कंठा वाढविणाऱ्या सोमवारच्या वेगवान घडामोडींनंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण दिले. त्यामुळे मंगळवार सकाळपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडीच केंद्रस्थानी होत्या. सोमवारच्या तुलनेत काहीशा संथगतीने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी दुपारनंतर मात्र प्रचंड वेग घेतला, त्यावर नजर...08.11 AM सकाळी १० वाजता काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार असल्याची माहिती. बैठकीनंतर अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे संकेत10.11 AM‘कोशिश करनेवालों की हार नहीं होती’(खासदार संजय राऊत यांचे रु ग्णालयातून टिष्ट्वट)10.48 AM दिल्लीतील काँग्रेस कोअर कमिटीची बैठक रद्द01.40 PM राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस(वृत्त वाहिन्यांची माहिती)02.25 PM राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली नाही (राजभवनातून स्पष्टीकरण)02.45 PM दिल्लीतून काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे,के. सी. वेणुगोपाल मुंबईत येऊन शरद पवारांना भेटणार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून एकत्रित निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून सरकार स्थापण्यासाठी शरद पवार यांना सर्वाधिकार - नवाब मलिक03.30 PM राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचे अधिकृतपणे स्पष्ट04.25 PM राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी द्यायला हवी होती; काँग्रेसची टीका04.30 PM राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट. मात्र अधिकृत दुजोरा नाही04.30 PM शरद पवार यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल मुंबईत दाखल05.35 PM महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; केंद्राच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी06.05 PM राज्यपालांनी पाठवलेल्या शिफारशीनुसार सत्ता स्थापनेची कोंडी फुटणार नाही, हे समजल्यामुळे राष्ट्रपती राजवटीला मंजुरी; राष्ट्रपती भवनातून माहिती06.20 PM राष्ट्रवादीने शिवसेनेला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याची माध्यमांमध्ये चर्चा06.55 PM यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक07.05 PM राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान - राज ठाकरे07.40 PM विधानसभा निकालानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेच्या पाठिंब्यासाठी अधिकृत प्रस्ताव सोमवारी दिला. त्या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतला जाईल - प्रफुल्ल पटेल07.42 PM राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयावर काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका. काँग्रेसला राज्यपालांनी न बोलावल्याबद्दल पटेल यांची नाराजी07.45 PM सर्वप्रथम राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी होतील. त्यानंतर शिवसेनेच्या प्रस्तावावर विचार - अहमद पटेल07.55 PM सरकार कसे बनवायचे, यावर चर्चा झाल्याशिवाय शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय नाही; शरद पवार आणि अहमद पटेल यांचे स्पष्टीकरण. किमान समान कार्यक्र मावर आधी चर्चा होणार; आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट08.05 PM राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी ४८ तासांची मुदत मागितली. मात्र, त्यांनी ती मान्य केली नाही. सत्ता स्थापनेचा शिवसेनेचा दावा कायम. किमान समान कार्यक्र म ठरवल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल - उद्धव ठाकरे08.05 PM भाजपने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद कबूल केले होते. मात्र नंतर मला खोटे ठरवले - उद्धव ठाकरे08.15 PM राज्यपालांनी ४८ तासांऐवजी ६ महिन्यांची मुदत दिली आहे. असा राज्यपाल सर्वांना लाभो; उद्धव ठाकरे यांचा टोला08.20 PM सत्ता स्थापनेसाठी १४५ आकडा गाठण्यास भाजप प्रयत्नशील. त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन. काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेला उल्लू बनवत आहेत - नारायण राणे08.40 PM जनादेश असूनही राज्यात सरकार स्थापन न होणे, राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस08.45 PM काही पक्षांच्या नेत्यांकडून जनादेशाचा अपमान. आमचे वेट अॅण्ड वॉच. भाजप सत्ता स्थापन करणार हे राणेंचे व्यक्तिगत मत - सुधीर मुनगंटीवार
Maharashtra Government: सकाळी शांतता... दुपारनंतर वेग, राज्यातील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 4:36 AM