Maharashtra Government : पंतप्रधान मोदी यांनी केलं देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 08:46 AM2019-11-23T08:46:22+5:302019-11-23T09:14:09+5:30
Maharashtra News : राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे.
मुंबई - शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार अशा घडामोडी सुरू असतानाच आज राजभवनातून मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे.
'देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे अभिनंदन. महाराष्ट्राच्या विकासासाठी दोघं मिळून काम करतील याचा मला विश्वास आहे' असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra.
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2019
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. तिन्ही पक्षांच्या बैठकांचे सत्र काही संपत नव्हते. यामुळे आम्ही भाजपासोबत दोन पक्षांचे सरकार स्थापन करायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.
PM Modi: Congratulations to Devendra Fadnavis ji and Ajit Pawar ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra. pic.twitter.com/ZLFR3D0Jeh
— ANI (@ANI) November 23, 2019
तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेला दोष देताना जनादेशाला त्यांनी नाकारले. राज्यात तीन पक्षांचे सरकार आले तर ते टिकेल की नाही याबाबत माहिती नाही. यामुळे अजित पवारांशी संपर्क साधला आणि स्थिर सरकार देण्याची चर्चा केली. अजित पवारांना शुभेच्छा, असे सांगितले आहे.
BIG BREAKING: ...अन् देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथhttps://t.co/JwVt4qCG8K
— Lokmat (@MiLOKMAT) November 23, 2019
#WATCH Mumbai: Devendra Fadnavis takes oath as Maharashtra Chief Minister again, oath administered by Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/kjWAlyMTci
— ANI (@ANI) November 23, 2019
Fadnavis takes oath as Maharashtra CM; NCP's Ajit Pawar becomes Deputy CM
— ANI Digital (@ani_digital) November 23, 2019
Read @ANI Story | https://t.co/6wc9hEpMAApic.twitter.com/vP2JOGlG8L
#WATCH Mumbai: NCP's Ajit Pawar takes oath as Deputy CM, oath administered by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/TThGy9Guyr
— ANI (@ANI) November 23, 2019