मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरता लवकरच संपुष्टात येणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आली आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असल्यानं इतर महत्त्वाच्या मंत्रिपदांसाठी तिन्ही पक्षांमध्ये बरीच चढाओढ सुरू होती. काल या संदर्भात महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठकदेखील झाली. त्यात मंत्रिपदांच्या वाटपावर बराच वेळ चर्चा झाली. कोणत्या पक्षाला नेमकी किती मंत्रिपदं द्यायची, यावर गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. अखेर कालच्या बैठकीत मंत्रिपदांच्या वाटपांचा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानुसार शिवसेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद, 10 कॅबिनेट व पाच राज्यमंत्रिपदे असतील. राष्ट्रवादीकडे 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसकडे 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं असतील. याशिवाय विधानसभाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे यासाठी दिलीप वळसे-पाटील तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे.संभाव्य खातेवाटपशिवसेना : नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, वित्त व नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, वने व पर्यावरण, शालेय शिक्षण, युवक कल्याण, सांस्कृतिक, मराठी भाषा, पर्यटन, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य व आदिवासी विकास.राष्ट्रवादी : गृह, सहकार, ऊर्जा, अपारंपारिक ऊर्जा, उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, महिला व बालकल्याण, रोजगार हमी, कामगार व कौशल्य विकास, पणन व वस्त्रोद्योगकाँग्रेस : महसूल, उद्योग, ग्रामविकास, कृषी, पाणीपुरवठा, उच्च व तंत्रशिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन (एफडीए), सामाजिक न्याय, पशुसंवर्धन व दुग्धविकास व अल्पसंख्यांक
Maharashtra Government: सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती; कोणत्या पक्षाला कोणती खाती?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 7:13 AM