नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागले होते. महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची याचिका दाखल करण्यात आली होती.
Live Updates:- उद्या पाचपर्यंत आमदारांचा शपथविधी करा आणि तातडीनं बहुमत चाचणी घ्या- न्यायालय- बहुमत चाचणी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीआधीच घ्या- न्यायालय- उद्याच होणार बहुमत चाचणी; हंगामी अध्यक्षपदाची नियुक्ती करण्याचे आदेश- लोकशाहीच्या मूल्यांचं संरक्षण आवश्यक- सर्वोच्च न्यायालय- शिवसेनेचे वकील न्यायालयात दाखल- अजित पवारांचे वकील मणींदर सिंग न्यायालयात पोहोचले- सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात