'शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री व्हायला निघालेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 07:53 AM2019-11-28T07:53:58+5:302019-11-28T07:55:50+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेचा समाचार

Maharashtra Government tarun bharat slams shiv sena chief uddhav thackeray for making alliance with congress ncp | 'शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री व्हायला निघालेत'

'शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री व्हायला निघालेत'

googlenewsNext

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनानं उद्धव ठाकरेंचं कौतुक करणारा अग्रलेख लिहिला आहे. तर संघाचं मुखपत्र असलेल्या 'तरुण भारत'नं उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसैनिक आता पालखीचे भोई बनणार नाहीत, तर शिवसैनिक पालखीत बसेल, असे सांगणारे उद्धव ठाकरे स्वत:च पालखीत बसायला निघाले आहेत, अशा शब्दांत संघानं उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. 

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायला हवं होतं. पण, ज्यांनी शिवसेनेला आपल्या जाळ्यात फसवलं आहे, त्या अजित पवारांच्या काकांनी नकार दिला आणि काँग्रेसलाही मान्य नाही म्हणून शिंदेंना पालखीत बसवायचे सोडून पक्षप्रमुख स्वत:च पालखीत बसायला निघाले आहेत, यावरूनच त्यांची सत्ताकांक्षा लक्षात येते. ‘मी नाही त्यातली अन्‌ कडी लावा आतली,’ या वाक्प्रचाराची अनुभूती महाराष्ट्राला करवून देण्याचे ज्यांनी ठरवले, ते आज कट्‌टर हिंदुत्वविरोधकांना सोबत घेऊन सत्तासुंदरीसोबत संसार थाटणार आहेत, ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, अशी टीका तरुण भारतनं केली आहे. 

महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला होता, त्या भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार सत्तेत येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अभद्र आघाडीचं सरकार सत्तारूढ होणार, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या हयातीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत बाळासाहेबांनी या दोन्ही विरोधकांना गाडण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षात ते 1995 साली यशस्वीही झाले होते. त्यानंतर हयात असेपर्यंत त्यांनी काँग्रेस-आघाडीला पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडले. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणार्‍या बाळासाहेबांच्या शिवसेनेने 1990 च्या दशकात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी मिळवली होती. प्रखर हिंदुत्व अंगीकारत हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणार्‍या बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वविरोधकांना जवळ केले नव्हते. 1992 साली जेव्हा अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे तमाम हिंदुत्ववाद्यांची मान गर्वाने उंचावली होती. ‘‘बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे,’’ असं बाळासाहेब ठाकरे यांनी ठासून सांगितलं होतं. आज बाळासाहेबांच्या वारसांनी ज्यांच्यासोबत संसार थाटण्याचा निर्णय केला आहे, त्यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्यास कायम विरोध केल्याचं विस्मरण वारसांना झालं आहे, हे अतिशय दुर्दैवी होय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करण्यात आली आहे. 

संघाच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाष्य करत तरुण भारतनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मध्यंतरी जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता, तेव्हा संघाचे हिंदुत्व आणि आमचे हिंदुत्व वेगळे आहे, असे जे विधान शिवसेनेने केलं होतं, त्यातला फरकही आता जनतेला कळून चुकला होता. राममंदिराचा मुद्दा तापलेला असतानाच, मधु मंगेश कर्णिक यांची एक कादंबरी आली होती. त्यात एक जण नायकाला विचारतो की, संघाचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व यात काय फरक आहे? तो नायक जे उत्तर देतो, ते जनतेच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं आहे. संघाचं हिंदुत्व हे कातडीसारखं शरीराला घट्‌ट चिकटलेलं आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे अंगावरील शालीसारखं कधीही उतरून टाकण्यासारखं आहे. मध्यंतरी जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता, तेव्हा संघाचे हिंदुत्व आणि आमचे हिंदुत्व वेगळे आहे, असे जे विधान शिवसेनेने केले होते, त्यातला फरकही आता जनतेला कळून चुकला होता. राममंदिराचा मुद्दा तापलेला असतानाच, मधु मंगेश कर्णिक यांची एक कादंबरी आली होती. त्यात एक जण नायकाला विचारतो की, संघाचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व यात काय फरक आहे? तो नायक जे उत्तर देतो, ते जनतेच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं आहे. संघाचं हिंदुत्व हे कातडीसारखं शरीराला घट्‌ट चिकटलेलं आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे अंगावरील शालीसारखं कधीही उतरून टाकण्यासारखं आहे. काय दूरदृष्टी होती हो कर्णिक यांची! सध्या महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे, तिला ही बाब तंतोतंत लागू पडते. एका मुख्यमंत्रिपदासाठी वारस एवढी टोकाची तडजोड करतील, तेही विचारसरणीत प्रचंड तफावत असलेल्या राजकीय विरोधकांशी, याचा विचारही सामान्य माणसाने कधी केला नव्हता. सध्या महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे, तिला ही बाब तंतोतंत लागू पडते. एका मुख्यमंत्रिपदासाठी वारस एवढी टोकाची तडजोड करतील, तेही विचारसरणीत प्रचंड तफावत असलेल्या राजकीय विरोधकांशी, याचा विचारही सामान्य माणसाने कधी केला नव्हता.
 

Web Title: Maharashtra Government tarun bharat slams shiv sena chief uddhav thackeray for making alliance with congress ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.