शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Maharashtra Government : उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; आज करणार सत्तास्थापनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:16 AM

महाविकास आघाडीचे ठरले; राजकीय अस्थिरता अखेर संपुष्टात

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आली असून, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे.शिवसेना नेत्यांच्या शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार आहोत, असे सांगितले. त्यानंतर सर्व सेना नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले, असे खा. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेस नेत्यांनी धरला होता. मात्र, उद्धव यांनी तेव्हा त्यास अद्याप होकार दिला नव्हता. बैठकीनंतर शिवसेना नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली. तिथे सेनेच्या नेत्यांनीही उद्धव यांना आपणच मुख्यमंत्री व्हा, असा जोरदार आग्रह केला. तो उद्धव यांनी मान्य केला, असे खा. राऊत म्हणाले.आज भेटणार राज्यपालांनातिन्ही पक्षांचे नेते शनिवारी संध्याकाळीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी तिन्ही पक्षांचे नेते भेटणार असून, उर्वरित मुद्यांवर चर्चा करणार आहे.१५:१५: १२ चा फॉर्म्युलाफॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद तसेच १० कॅबिनेट व पाच राज्यमंत्रिपदे असतील. राष्ट्रवादीकडे ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदे तर काँग्रेसकडे ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदे असतील.विधानसभाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे यासाठी दिलीप वळसे-पाटील तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.हे नेते होते बैठकीसाठी हजरराष्ट्रवादी : शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवारशिवसेना : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदेकाँग्रेस : अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खानसंभाव्य खातेवाटपशिवसेना : नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, वित्त व नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, वने व पर्यावरण, शालेय शिक्षण, युवक कल्याण, सांस्कृतिक, मराठी भाषा, पर्यटन, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य व आदिवासी विकास.राष्ट्रवादी : गृह, सहकार, ऊर्जा, अपारंपारिक ऊर्जा, उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, महिला व बालकल्याण, रोजगार हमी, कामगार व कौशल्य विकास, पणन व वस्त्रोद्योगकाँग्रेस : महसूल, उद्योग, ग्रामविकास, कृषी, पाणीपुरवठा, उच्च व तंत्रशिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन (एफडीए), सामाजिक न्याय, पशुसंवर्धन व दुग्धविकास व अल्पसंख्यांक 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस