मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजीचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबरची जयंती या दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या कालावधीत नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा नंतरच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर १० सप्टेंबरपर्यंत प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रलंबित प्रकरणांपैकी कितीचा निपटारा झाला आणि निपटारा न झालेल्या प्रकरणांविषयी अहवाल १० ऑक्टोबरपर्यंत अधिकाऱ्यांना सरकारला सादर करावा लागणार आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरणतांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थींना लाभ देणेफेरफार नोंदीचा निपटारा, शिधापत्रिकांचे वितरणविवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणेनव्याने नळजोडणीमालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणेप्रलंबित घरगुती वीजजोडणीस मंजुरीबिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थींची ऑनलाइन नोंदणीअनुसूचित जमातीच्या लाभार्थींची प्रलंबित वनहक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून)दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देणे.
प्रदेश काँग्रेसची टीकासेवाच करायची तर गांधी सप्ताह पाळणे सयुक्तिक ठरले असते. वाढदिवस साजरा करण्यासाठी महात्मा गांधींशी संबंध जोडणे म्हणजे माहात्म्याचे कार्य कमी लेखणे होय. त्यापेक्षा राज्य सरकारने ‘सत्ता पंधरवडा’ असे नाव द्यायला हवे होते, अशी बोचरी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.