अतुल कुलकर्णी,
मुंबई- महाराष्ट्रातील प्राणहिता, गोदावरी व पैनगंगा या नद्यांवरील तुमडीहेटी, मेडिगट्टा आणि चनाखा-कोर्टा असे तीन बंधारे (बॅरेज) बांधण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील १३ आणि गडचिरोली जिल्ह्यातील २० गावांची मिळून २६४ हेक्टर नदीकाठची जमीन कायमची पाण्याखाली जाणार आहे. महाराष्ट्राला १३.८ टीएमसी, तर तेलंगणला तब्बल १६१.२ टीएमसी पाणी मिळणार आहे. तेलंगणसाठी गेमचेंजर ठरणारा हा निर्णय महाराष्ट्रातील पाण्यावर घेतला जाणार आहे. या तीनही नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत. गेल्यावर्षी गोदावरीतील १ हजार टीएमसी पाणी वाहून गेले. याबाबत लोकमतशी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, तीन बंधाऱ्यांमुळे राज्यातील एकही गाव पाण्याखाली जाणार नाही. जास्तीत जास्त पाणी नदीपात्रात साठवले जाईल. नदीकाठच्या बुडीत होणाऱ्या जमिनीचा मोबदला नवीन भूसंपादन कायद्यानुसार दिला जाणार आहे. हा मोबदला आणि तीनही बंधाऱ्यांचा खर्च तेलंगणा सरकार करणार आहे. राज्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र -तेलंगण आंतरराज्य मंडळाची पहिली बैठक मंगळवारी मुंबईत झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद अली, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, तर तेलंगणाचे जलसंपदा मंत्री हरिश राव, वित्तमंत्री नितीन राजेंद्र, कृषीमंत्री श्रीनिवास रेड्डी, वनमंत्री जोगू रम्मणा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, प्रधान सचिव प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल आदी उपस्थित होते.>प्राणहिता नदीवरील तुमडीहेटी बॅरेजची पाणी पातळी समुद्र सपाटीपासून तुलनेत १५२ मिटर प्रस्तावित केली होती. त्यामुळे ७४१ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाणार होते पण आज झालेल्या निर्णयामुळे आता ही उंची १४८ मीटर असेल ज्यामुळे ११४ हेक्टर जमीन पाण्याखाली जाईल. यामुळे महाराष्ट्राला ९ टीएमसी आणि तेलंगणाला २० टीएमसी पाणी मिळेल.पैनगंगा नदीवर होणाऱ्या चनाखा कोर्टा बॅरेजमुळे शून्य टक्के क्षेत्र बुडित होणार आहे. याची उंची २१३ मीटर मान्य करण्यात आली असून यामुळे महाराष्ट्राला ०.३ टीएमसी तर तेलंगणाला १.२ टीएमसी पाणी मिळणार आहे.प्राणहिता नदीवरील तुमडीहेटी बॅरेजची पाणी पातळी समुद्र सपाटीपासून तुलनेत १५२ मिटर प्रस्तावित केली होती त्यामुळे ७४१ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाणार होते पण आज झालेल्या निर्णयामुळे आता ही उंची १४८ मीटर असेल ज्यामुळे ११४ हेक्टर जमिन पाण्याखाली जाईल. यामुळे महाराष्ट्राला ९ टीएमसी आणि तेलंगणाला २० टीएमसी पाणी मिळेल.गोदावरी नदीवरील मेडीगट्टा बॅरेजची उंची देखील १०३ वरुन १०० मिटर करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे १५० हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे. या बॅरेजचे बॅक वॉटर ४० ते ४५ किलोमीटर जाईल त्यामुळे त्या भागातील जमिनी पाण्याखाली जातील. या बॅरेजमुळे महाराष्ट्राला ४.५ तर तेलंगणाला १४० टीएमसी पाणी मिळणार आहे.तेलंगणा राज्याच्या तुमडीहेटी व मेडीगट्टा बॅरेजमुळे महाराष्ट्राचे पाणी वापराचे हक्क बाधीत होणार नाहीत, या दोन्ही बॅरेजच्या बांधकामाचा निर्णय दोन्ही राज्यांच्या संमतीनेच आंतरराज्य मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पैनगंगा नदीवर होणाऱ्या चनाखा कोर्टा बॅरेजमुळे शुन्य टक्के क्षेत्र बुडीत होणार आहे. याची उंची २१३ मीटर मान्य करण्यात आली असून यामुळे महाराष्ट्राला ०.३ टीएमसी तर तेलंगणाला १.२ टीएमसी पाणी मिळणार आहे.>मेडीगट्टाचा महाराष्ट्राला लाभगोदावरी नदीवरील मेडीगट्टा बॅरेजची उंची देखील १०३ वरुन १०० मिटर करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे १५० हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे. या बॅरेजचे बॅक वॉटर ४० ते ४५ किलोमीटर जाईल, त्यामुळे त्या भागातील जमिनी पाण्याखाली जातील. या बॅरेजमुळे महाराष्ट्राला ४.५ तर तेलंगणाला १४० टीएमसी पाणी मिळेल.प्राणहिता नदीवरील तुमडीहेटी बॅरेजची पाणी पातळी समुद्र सपाटीपासून तुलनेत १५२ मिटर प्रस्तावित केली होती त्यामुळे ७४१ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाणार होते पण आज झालेल्या निर्णयामुळे आता ही उंची १४८ मीटर असेल ज्यामुळे ११४ हेक्टर जमिन पाण्याखाली जाईल. यामुळे महाराष्ट्राला ९ टीएमसी आणि तेलंगणला २० टीएमसी पाणी मिळेल.>गोदावरी पाणी तंटा लवादानुसार असणारा पाणी हक्क, मत्स्य व्यवसाय करणे, नदीतील दळणवळण हे अधिकार महाराष्ट्राकडे राहणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील एकही गाव, गावठाण बुडणार नाही. उपसा सिंचन योजनांना बाराही महिने पाणी मिळणार आहे. या भागातील नागरिकांनी या प्रकल्पांना विरोध करू नये.- देवेंंद्र फडणवीस, मुख्यमंत्री >या प्रकल्पाचा फायदा दोन्ही राज्यांना होणार असून हा माझा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. महाराष्ट्र-तेलंगणच्या प्रगतीसाठी चांगली संधी आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राशी कोणताही वाद नसून याबाबत आंध्रशी असलेल्या वादात महाराष्ट्र आणि तेलंगण एकजुटीने बाजू मांडतील.- के.चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री तेलंगण