शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चिंताजनक! बलात्कारानंतर महिलांच्या हत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 2:09 AM

९४ टक्के खटले प्रलंबित; आत्महत्येस प्रवृत्त करण्याचेही मोठे प्रमाण

- मनीषा म्हात्रेमुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बलात्कारानंतर हत्येच्या घटनेने देश हादरला आहे. अशात उत्तरप्रदेशच नाही तर गेल्या वर्षभरात बलात्कार, सामुहिक बलात्कारानंतर २८६ महिलांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४७ घटनांची नोंद आहे. त्याखालोखाल उत्तरप्रदेश आणि राजस्थानचा क्रमांक लागत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने(एनसीआरबी) जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर  आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न गंभीर असताना राज्यात  दोन लाख सात हजार (९४ टक्के) खटले प्रलंबित आहेत. राज्यातील न्यायालयांनी वर्षभरात सुमारे १३ हजार खटले निकाली काढले असून त्यापैकी दिड हजार खटल्यांमधील आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला आहे.  तर साडेनऊ हजार खटल्यांमधील आरोपी पुरावे नसल्याने निर्दोष सुटले आहेत. यात महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर १३.७ टक्के आहे.२०१९ अत्याचाराचे गुन्हेघटना    पीडितबलात्कार२,२९९    २,३०५बलात्कार/हत्या४७    ४७अपहरण६,९०६    ७,००८विनयभंग१०,४७२    १०,५१२तस्करी२२०    ६१४आत्महत्येस प्रवृत्त८०२    ८०८     हुंडा बळी१९६    १९६चिमुकलेही असुरक्षित...राज्यात अल्पवयीन मुलीही असुरक्षित आहेत. पॉक्सो अंतर्गत दाखल गुह्यांत देशात दर लाख लोकसंख्येमागे सरासरी सात गुन्हे घडतात. तर महाराष्ट्रात ११ गुन्हे घडत आहेत.महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर १३.७% विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर आहे

टॅग्स :Murderखून