पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामध्ये कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
श्रेणी/ गुणसुधार विद्यार्थ्यांना श्रेणी/ गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेला पुन्हा बसण्याची संधी देण्यात आली आहे. जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्च २०१९ ची परीक्षा अशा दोन संधी मिळतील. अनुत्तीर्ण व श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्यांसाठीही जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होईल. निकालानंतर दुस-या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी अर्ज करता येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या काळात तर छायांकित प्रतीसाठी ३१ मे ते १९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या प्रती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावे लागतील.
सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
कुठे पाहाल निकाल?http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
1. www.mahresult.nic.in2. www.result.mkcl.org3. www.maharashtraeducation.com4. www.rediff.com/exams5. http://maharashtra12.jagranjosh.com
कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.