शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 6:04 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Sharad Pawar : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. अशातच, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी आयत कोलीत हाती लागलंय. दरम्यान, आज(दि.13) महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात परिवर्तन होण्याचा दावा केला.

मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."

पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता राजकीय परिवर्तनासाठी आतुर झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेची ही भावना दिसून येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सध्याच्या सरकारपासून आम्हाला जनतेची मुक्तता करायची आहे, असे ते म्हणाले

शरद पवार पुढे म्हणाले की, देशातील सर्वोत्तम मानले जाणारे राज्य प्रशासन महायुतीच्या राजवटीत खचले आहे. आम्हाला सध्याच्या सरकारपासून जनतेची मुक्तता करायची आहे आणि ते आम्हाला साथ देतील याची मला खात्री आहे. महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

सर्वसामान्यांची चेष्टा...पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने अलीकडे ज्या प्रकारचे निर्णय घेतले आहेत, ते सर्वसामान्यांची चेष्टा करण्यासारखे आहेत. आम्ही लोकांना या सरकारपासून मुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहोत आणि मला आशा आहे की लोक आम्हाला साथ देतील. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ही फसवी आहे, या योजनेसाठी अर्थसंकल्प आणि आर्थिक तरतूद याबाबत स्पष्टता नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४