शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शिवसैनिक, बोललो ते बोललो..."; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन
2
जनरल मोटर्स, फोर्ड आता फोक्सवॅगन! जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात अपयशी ठरली 
3
"आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!
4
Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक
5
Priyanka Gandhi : "BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं..."; प्रियंका गांधी कडाडल्या
6
धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी
7
बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण
8
"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे
9
"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन
10
राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी
11
थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...
12
उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?
13
'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा
14
"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी
15
Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल
16
हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत, SEBI कडून कारणे द्या नोटीस; भारतीय दिग्गज बँकेचंही आलं नाव पुढे 
17
No Entry फेम सेलिना जेटलीनं बॉलिवूडला केला रामराम, वैवाहिक आयुष्याचा घेतेय आनंद
18
"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..."
19
Share Market 2 july : शेअर बाजारात आधी तेजी, मग घसरण; अदानी पोर्ट्स, पॉवर वधारला; टाटा मोटर्समध्ये घसरण

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 8:44 PM

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली. 

पुणे-आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२२-२३ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी फडणवीसांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली. 

कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल.  मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.

मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात येईलकै.खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर महाराष्ट्र पदक मिळविणाऱ्या मल्लांना तयार करण्यात  मागे राहिला.  ही उणिव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तराव पदक जिंकणारा किमान एकतरी मल्ल महाराष्ट्राचा असेल अशी मोहिम सुरू करण्यात येईल.  महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेतल्यास शासन त्यालाही सहकार्य करेल. 

मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान-क्रीडामंत्रीडोळ्याचे पारणे फेडणारी स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केल्याबद्दल कौतुक करून क्रीडामंत्री महाजन म्हणाले, कुस्ती हा खेळ मेहनतीचा आणि बुद्धीचातुर्याचा आहे. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते. आयुष्यभर कष्ट करून देशाला नाव मिळवून देणाऱ्या पैलवानांना तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी  आहे. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत १० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैलवानांचाही सन्मान करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्ती