सातारा :
‘महाराष्ट्र केसरी’चा बहुमान पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटीलवर सातारकरांकडून रविवारी बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. स्पर्धेच्या आयोजकांकडून बक्षिसाची रक्कम न मिळाल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. याची दखल घेत साताऱ्यातील राजकीय मंडळी, संस्था, उद्योजकांनी बक्षीस जाहीर करीत ‘महाराष्ट्र केसरी’चा सन्मान केला.
सातारा शहराला तब्बल सहा दशकांनंतर ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरचा ५ विरुद्ध ४ असा पराभव करून ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला. या स्पर्धेनंतर पृथ्वीराज पाटील याने स्पर्धेच्या आयोजकांकडून बक्षिसाची रक्कम न मिळाल्याची खंत माध्यमांसमोर व्यक्त केली होती. त्यानंतर कोणी रोख रक्कम, तर कोणी वस्तूरूपात बक्षीस जाहीर केले आहे.यांनी दिले बक्षीस- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने रोख पाच लाखांचे बक्षीस.- गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या कै. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टकडून दोन लाखांचा धनादेश.- रक्षक प्रतिष्ठानकडून रोख १ लाख ५१ हजार रुपये.- श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज तालीम संघातर्फे बुलेट.- महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील यांच्या स्मरणार्थ रोख एक लाख.