शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 12:13 PM

Maharashtra Legislative Council Election 2024: विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (kiran Shelar) आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे (Shivnath Darade) यांना भाजपाने संधी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपत असतानाच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि  नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाने संधी दिली आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.

लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली तरी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्षांमध्ये एकमत झालेलं दिसलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी भाजपाचा विद्यमान आमदार असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपाची कोंडी झाली होती. मात्र भाजपाने कोकण पदवीधर मतदारसंघाच निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी दिल्याने येथील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. किरण शेलार यांचा सामना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी होणार आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून  भाजपाकडून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  शिवनाथ दराडे यांच्यासमोर ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर यांचे आव्हान आहे.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाNiranjan Davkhareनिरंजन डावखरेMumbaiमुंबईkonkanकोकण