Maharashtra Lockdown: निर्बंधांबाबत मोठी बातमी; किराणा मालाची दुकानं आता फक्त ४ तासच खुली राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:16 PM2021-04-19T18:16:48+5:302021-04-19T18:23:16+5:30

Maharashtra Lockdown: किराणा खरेदीच्या नावे लोकं निर्बंध असतानाही बाहेर फिरत असल्यानं घेण्यात आला निर्णय. ऑक्सिजन निर्मितीच्या वाढीसाठीही अजित पवारांच्या सूचना

Maharashtra Lockdown coronavirus restrictions grocery store will now only be open for 4 hours ajit pawar | Maharashtra Lockdown: निर्बंधांबाबत मोठी बातमी; किराणा मालाची दुकानं आता फक्त ४ तासच खुली राहणार

Maharashtra Lockdown: निर्बंधांबाबत मोठी बातमी; किराणा मालाची दुकानं आता फक्त ४ तासच खुली राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देकिराणा खरेदीच्या नावे लोकं निर्बंध असतानाही बाहेर फिरत असल्यानं घेण्यात आला निर्णय. ऑक्सिजन निर्मितीच्या वाढीसाठीही अजित पवारांच्या सूचना

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं निर्बंध घातले आहे. परंतु अत्यावश्यक सेवा आणि किराणामाल खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्यांवर वर्दळही काय आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करावीत. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकसचिवांनी जिल्हा प्रशासन व मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. याशिवाय निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

ऑक्सिजन निर्मिती वाढवण्याच्या सूचना

या बैठकीत राज्यातील रुग्णालयात उपलब्ध खाटांचा, ऑक्सिजन तसेच रेमिडिसिव्हीर औषध पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तसेच येणाऱ्या काळात इतर राज्यात रुग्णवाढ झाल्यानंतर महाराष्ट्राला बाहेरुन मिळणारा ऑक्सिजन कमी पडण्याची भीती लक्षात घेऊन राज्यातंच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करावी. कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्रकल्प स्थापन झाले आहेत. मुंबई महापालिकेनेही अशा प्रकल्पनिर्मिती संदर्भात कार्यवाही सुरु केली आहे. या तिघांनी विहित प्रक्रियेद्वारे खरेदी केलेल्या दरांना प्रमाण मानून नवीन ऑक्सिजन प्रकल्पांसाठी खर्च करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामुळे निविदा प्रक्रियेतील विलंब टाळता येईल व प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजननिर्मिती वाढवण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

रेमडेसिवीरसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

राज्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमिडिसिव्हिर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. 

किराणाच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही - आरोग्यमंत्री

किराणाचं दुकान दिवसभर उघडं असल्यामुळे अनेक जण किराणाच्या दुकानाच्या नावानं विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतायत. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी ७ ते ११ या कालावधीत किराणामालाची दुकानं उघडी ठेवूया असं सांगितलं. कारण दिवसभर किराण्याच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही. त्यामुळे अशा स्वरुपाचा बद केला पाहिजे. विशेष म्हणजे वरुनच तो बदल व्हावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तो बदल ठेवू नये, असा निर्णय सर्वानुमते झाला,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

Web Title: Maharashtra Lockdown coronavirus restrictions grocery store will now only be open for 4 hours ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.