मुंबई - राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. अशावेळी राज्यात क़डक लॉकडाऊन होण्याची शक्यत निर्माण झाली आहे. राज्य सरकार सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी "आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या" असं म्हटलं आहे.
"राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या" अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपलं मत मांडलं आहे. या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सीताराम कुंटे बैठकीला हजर आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे, लॉकडाऊनबद्दलचा मधला मार्ग काढावा, मध्यबिंदू काढला पाहिजे, लॉकडाऊनबद्द्ल माध्यमांना फक्त दोन ते तीन लोकांनी माहिती द्यावी, जास्त लोक बोलत राहिले तर लोकांचं कन्फ्युजन होतं, असा मुद्दा अशोक चव्हाणांनी मांडला आहे.
आम्ही राजकारण थांबवतो, फक्त एकच अट; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना मोठे आश्वासन
तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही, असे म्हटले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर ठेवली आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतोय आणि हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
आता निर्णय घेण्याची वेळ, कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं जाण्याची दाट शक्यता आहे. सर्वपक्षीय बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत.