शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

‘घड्याळा’बाबत ‘तो’ उल्लेख करा; अन्यथा..., सुप्रीम काेर्टाची अजित पवार गटाला पुन्हा समज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 12:20 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: ‘घड्याळ’ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला. 

 नवी दिल्ली : ‘घड्याळ’ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा आज सर्वोच्च न्यायालयानेअजित पवार गटाला दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत ‘घड्याळ’ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिरात अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्या तसेच निवडणुकीशी संबंधित प्रत्येक प्रचार पत्रक, ध्वनिमुद्रित संदेश आणि चित्रफितींमध्ये ‘न्यायप्रविष्ट’ असा उल्लेख करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १९ मार्च रोजी दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन अजित पवार गटाने कुठल्याही वृत्तपत्रातून केलेले नाही. उलट निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर न्यायालयाच्या आदेशातील शेवटची ओळ वगळण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करून अजित पवार गटाने या आदेशाची थट्टा उडवली आहे, अशी तक्रार शरद पवार यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी केली.

न्यायालयाचा आदेश स्पष्ट  असून त्यातून दुहेरी अर्थ काढण्यास कोणताही वाव नाही, असे आज न्या. सूर्यकांत व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने बजावले. 

निवडणूक संपेपर्यंत आदेशाचे पालन करा! १९ मार्चच्या आदेशानंतर अजित पवार गटाने आतापर्यंत किती जाहिराती प्रसिद्ध केल्या आणि त्यातील मजकूर काय होता याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना न्यायालयाला काही जाहिराती दाखवल्या. न्यायालयाच्या आदेशातील शेवटच्या ओळीत बदल करण्याविषयीचा अर्ज भविष्यासाठी केला आहे, असे रोहतगी म्हणाले. मात्र निवडणूक संपेपर्यंत आदेशाचे पालन करावेच लागेल, असे नमूद करून या प्रकरणी पुढील सुनावणी लवकरात लवकर करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४