लोकसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने दिलेलं संपत्तीच्या सर्वेक्षणाचं आश्वासन आणि त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका यामुळे सध्या देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ज्या व्यक्तीने घरच्या मंगळसूत्राला मान देऊ शकला नाही, त्याने इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संजय राऊत म्हणाले की, सॅप पित्रोदा यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचं सांगितलं आहे. जसे नरेंद्र मोदी आता महिलांच्या मंगळसूत्राला हात घालू लागले आहेत. पाकिटमारी करू लागले आहेत, ही भाजपाची भूमिका आहे का? खरं म्हणजे काँग्रेसच्या राज्यात नाही तर मोदींच्या राज्यात महिलांची मंगळसूत्र गहाण पडत आहेत. लुटली जात आहेत आणि हे मंगळसूत्राच्या गोष्टी केल्या जात आहे. जो माणूस स्वत:च्या घरातील मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही. त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये.
यावेळी सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. मला असं वाटतं की, तिथे भाजपाने दोन उमेदवार ठेवले आहेत. आमच्या पैलवानाशी लढत द्यायला. एक उमेदवार कमी पडतो आहे. त्यामुळे भाजपाने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे. घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपाने दुसरा उमेदवार अप्रत्यक्षपणे आणला आहे का? यासंदर्भात लोकांच्या मनात शंका आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.