मुंबई : राज्यातील नवनिर्वाचित खासदारांमध्ये १५ जण हे वयाची साठी ओलांडलेले आहेत. गोवाल पाडवी (३१) हे सर्वात कमी वयाचे खासदार असून सर्वात जास्त वय छत्रपती शाहू महाराज (७६) यांचे आहे. महाराष्ट्रातील खासदारकीचा चेहरा फारसा तरुण नाहीच. मात्र, लोकसभेला विधानसभेसारखी कमी वयात संधी सहसा दिली जात नाही हेही प्रमुख कारण आहे.
साठी वा साठी ओलांडलेलेश्रीरंग बारणे ६० (मावळ), कल्याण काळे ६१ (जालना), संदीपान भुमरे ६२ (औरंगाबाद), प्रतापराव जाधव ६३ (बुलडाणा), शोभा बच्छाव ६५(धुळे), नामदेव किरसान ६५ (गडचिरोली-चिमूर), रवींद्र वायकर ६५ (उत्तर-पश्चिम मुंबई), अनिल देसाई ६६ (दक्षिण-मध्य मुंबई), नितीन गडकरी ६७ (नागपूर), वसंतराव चव्हाण ६९ (नांदेड), सुनील तटकरे ६९ (रायगड), अरविंद सावंत ७२ (दक्षिण मुंबई), नारायण राणे ७२ (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), भाऊसाहेब वाकचौरे ७४ (शिर्डी) , छत्रपती शाहू महाराज ७६ (कोल्हापूर).
चाळीस वा त्यापेक्षा कमी वयाचे गोवाल पाडवी ३१ (नंदुरबार), रक्षा खडसे ३६ (रावेर), डॉ. श्रीकांत शिंदे ३७ (कल्याण) , प्रतिभा धानोरकर ३८ (चंद्रपूर) , अनुप धोत्रे ३९ (अकोला), ओम राजेनिंबाळकर ४० (उस्मानाबाद).
चाळिशी ते साठीतील डॉ. अमोल कोल्हे ४३ (शिरूर) , प्रणिती शिंदे ४३ (सोलापूर), विशाल पाटील ४३ (सांगली), धैर्यशील माने ४३ (हातकणंगले) , नीलेश लंके ४४ (अहमदनगर), डॉ. प्रशांत पडोळे ४५ (भंडारा-गोंदिया), श्यामकुमार बर्वे ४६ (रामटेक), डॉ. हेमंत सावरा ४७ (पालघर), धैर्यशील मोहिते ४७ (माढा), वर्षा गायकवाड ४९ (उत्तर-मध्य मुंबई), मुरलीधर मोहोळ ४९ (पुणे), अमर काळे ५० (वर्धा) , नागेश आष्टीकर ५२ (हिंगोली) , भास्कर भगरे ५३ (दिंडोरी) , सुरेश म्हात्रे ५३ (भिवंडी), बजरंग सोनवणे ५३ (बीड) , नरेश म्हस्के ५४ (ठाणे), सुप्रिया सुळे ५४ (बारामती) , डॉ. शिवाजी काळगे ५४ (लातूर), संजय देशमुख ५५ (यवतमाळ-वाशिम), संजय दिना पाटील ५५ (उत्तर-पूर्व मुंबई), स्मिता वाघ ५६ (जळगाव), बळवंत वानखेडे ५६ (अमरावती), संजय जाधव ५७ (परभणी), उदयनराजे भोसले ५८ (सातारा) , राजाभाऊ वाजे ५९ (नाशिक) , पीयूष गोयल ५९ (उत्तर मुंबई).