Beed Satara Madha Election Result ( Marathi News ) : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील ३० मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे असून १७ जागांवर महायुतीने आघाडी घेण्यात यश मिळवलं आहे, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने मताधिक्य घेतलं आहे. महाराष्ट्रात काही मतदारसंघांमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून दिग्गज उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, राज्यातील सातारा, जालना, ठाणे, रत्नागिरी, भिवंडी, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, नांदेड या मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार पिछाडीवर असून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली आहे. तर बीडमध्येही बजरंग सोनवणे यांच्याकडून पंकजा मुंडे यांच्याविरोधात चांगली लढत दिली जात आहे.
आतापर्यंतच्या कलानुसार कोणत्या मतदारसंघात काय आहे स्थिती?
सातारा
शशिकांत शिंदे - १६ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
कल्याण काळे - २ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
ठाणे
नरेश म्हस्के - ८८ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
रत्नागिरी
नारायण राणे - १४ हजारांपेक्षा जास्त आघाडी
भिवंडी
बाळ्यामामा म्हात्रे - १० हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
नंदुरबार
गोवाल पाडवी - ८५ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
नाशिक
राजाभाऊ वाजे - ११ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
दिंडोरी
भास्कर भगरे - ३२ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
हातकणंगले
सत्यजीत पाटील - साडेतीन हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
कोल्हापूर
शाहू छत्रपती - ४९ हजारांपेक्षा जास्त आघाडी
माढा
धैर्यशील मोहिते पाटील - १३ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी
वसंतराव चव्हाण - १८०० पेक्षा जास्त मतांची आघाडी
बजरंग सोनवणे - ५ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी