शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

Maharashtra Lok Sabha election results 2024: राज्यातील ४८ खासदारांपैकी २६ खासदार मराठा, तर ९ ओबीसी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 12:15 PM

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे.

मुंबई : राज्यातील नवनिर्वाचित ४८ खासदारांपैकी २६ खासदार हे मराठा समाजाचे, तर नऊ ओबीसी आहेत. अनुसूचित जातींचे सहा खासदार निवडून आले. अनुसूचित जातींचे सहा, तर अनुसूचित जमातींचे चार खासदार आहेत. वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव खासदार ठरल्या आहेत. राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. यावेळीही तेच चित्र दिसून येते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरला होता.

अनुसूचित जमातींचे खासदार १) भास्कर भगरे २) डॉ. हेमंत सावरा ३) डॉ. नामदेव किरसान ४) गोवाल पाडवी 

अनुसूचित जातींचे खासदार १) बळवंत वानखेडे २) भाऊसाहेब वाकचौरे ३) प्रणिती शिंदे ४) वर्षा गायकवाड ५) श्यामकुमार बर्वे ६) डॉ. शिवाजी काळगे. 

मराठा समाजाचे खासदार१) स्मिता वाघ, २) शाहू छत्रपती ३) डॉ. शोभा बच्छाव ४) नारायण राणे ५) श्रीकांत शिंदे ६) उदयनराजे भोसले ७) नरेश म्हस्के ८) विशाल पाटील ९) सुप्रिया सुळे १०) मुरलीधर मोहोळ ११) श्रीरंग बारणे १२) धैर्यशील मोहिते १३) धैर्यशील माने १४) संजय देशमुख १५) अरविंद सावंत १६) प्रतापराव जाधव १७) राजाभाऊ वाजे १८) नीलेश लंके १९) ओमप्रकाश राजेनिंबाळकर २०) डॉ. कल्याण काळे २१) संदीपान भुमरे २२)  वसंत चव्हाण २३) नागेश आष्टीकर २४) संजय जाधव २५) बजरंग सोनवणे २६) अनुप धोत्रे

ओबीसी खासदार १) रक्षा खडसे २) प्रतिभा धानोरकर, ३) सुनील तटकरे ४) रवींद्र वायकर ५) डॉ. अमोल कोल्हे ६) डॉ. प्रशांत पडोळे ७) अमर काळे ८) संजय दिना पाटील ९) सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे,

खुला प्रवर्ग - १) नितीन गडकरी- ब्राह्मण २) पीयूष गोयल- अग्रवाल ३) अनिल देसाई- सारस्वत ब्राह्मण.

- मराठा समाजाच्या विजयी खासदारांमध्ये महाविकास आघाडीतर्फे २६ पैकी १४ जण निवडून आले. त्यांची टक्केवारी ५४ इतकी आहे. एक अपक्ष आहेत. महायुतीतर्फे ११ मराठा उमेदवार जिंकले. त्यांची टक्केवारी २३ आहे. ओबीसी समाजाच्या खासदारांची एकूण टक्केवारी १९ इतकी आहे. त्यातील ३ महायुतीचे आहेत. तर ६ जण महाविकास आघाडीचे आहेत. ३ खासदार खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांची टक्केवारी केवळ सहा इतकी आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४