शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live :एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2024 7:01 AM

Maharashtra Lok Sabha General Election Results 2024 Live Updates : सत्ताधारी महायुतीसाठी तसेच महायुतीला धक्के देण्यासाठी सज्ज असलेल्या मविआसाठीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे. 

04 Jun, 24 08:56 PM

एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानलं

एनडीएच्या विजयानंतर दिल्लीत भाजपाने दिल्लीत विजयी सभा घेतली. एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानले.

04 Jun, 24 08:37 PM

उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ २०१४च्या मोदी लाटेत भाजपाच्या हाती गेला. तेव्हा विजयी उमेदवार पूनम महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ एवढे अधिकचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येथे ४ लाख मतांचा आकडा पार करणे काँग्रेससाठी मोठे आव्हान होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेला उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचा आकडा मोडीत काढत स्वतःची मते वाढविण्यात काँग्रेस यशस्वी ठरले. 
 

04 Jun, 24 08:36 PM

शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ६६ हजार २९२ मतांनी विजयी

शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ६६ हजार २९२ मतांनी विजयी झाले आहेत.  बाळ्या मामा यांना एकूण मते ४ लाख ९८ हजार १९९ झाली असून  कपिल पाटील यांना  एकूण मते  ४ लाख ३१ हजार ९०७ आहेत. निलेश सांबरे एकूण मते २ लाख ३० हजार २५४ आहेत.

04 Jun, 24 08:19 PM

गडकरींची नागपुरातून हॅटट्रीक,१.३७ लाखांचे मताधिक्य

नागपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला दबदबा कायम राखत विजय मिळविला आहे. त्यांची ही हॅटट्रीक ठरली आहे. एकूण मतदानाच्या ५४.०५ टक्के मत गडकरी यांच्याच पारड्यात आली आहेत. मागील वेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य १.५६ टक्क्यांनी घटले आहे.

04 Jun, 24 08:12 PM

फेर मोजणीत रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी

एकूण मतमोजणी ९५४९३९ मतदान मोजणी झाली.यात  शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर-४५२६४४ मते मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार अमोल -कीर्तिकर  यांना ४५२५९६
मते मिळाली. फेर मत मोजणीत वायकर हे ४८ मतांनी विजयी झाल्याचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी घोषित केले.

04 Jun, 24 07:59 PM

नेस्को ग्राउंड बाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती

मुंबई: गोरेगाव नेस्को ग्राउंडच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची गर्दी जमू लागली आहे. त्यानी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करायला ही सुरुवात केली आहे. या ठिकाणची गर्दी वाढीस लागल्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मतमोजणीच्या वेळी झालेल्या गोंधळा बाबत जसजसे दोन्ही गटाच्या कार्यकर्ते यांना समजत आहे, तसतसं त्यांनी नेस्को ग्राउंडच्या जवळ त्यांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त अधिक  बंदोबस्त कडक केला आहे. परिमंडळ १२ मधील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत. तसेच साध्या वेशातील पोलिसही गर्दीला पांगवण्याचा तसेच त्यांचे संबंध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

04 Jun, 24 07:53 PM

उत्तर पश्चिम मध्ये सावळा गोंधळ; अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यात तिढा वाढला 

उत्तर पश्चिम मध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यत तिढा वाढला आहे.  रेकॉऊंटिंग नंतर अमोल कीर्तिकरं याना ४८ मतांनी पराभूत दाखवलं आहे,  नियमानुसार रिजेक्ट झालेल्या बॅलेट ची संख्या पराभवाच्या मार्गीन पेक्षा जास्त असेल तरं रिजेक्ट झालेल्या पोस्टल बॅलेटची पुन्हा कॉऊंटिंग केली जाते.  सध्या १११ पोस्टल बॅलेटची मत बाद झाली असून त्याची रेकॉऊंटिंग सुरु आहे.

04 Jun, 24 07:25 PM

अकाेल्यात भाजपाने गड राखला; अनुप धाेत्रेंनी राखली वडिलांच्या विजयाची परंपरा कायम

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयश्री खेचून आणला. अंत्यत चुरशिच्या झालेल्या या लढतीत धाेत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार डाॅ. अभय पाटील यांचा ४०,६२६ मतांनी पराभव केला. डाॅ़ अभय पाटील यांनी तगडी लढत दिली. अॅड प्रकाश आंबेडकरांच्या साेशल इंजिनिअरींगचा करिष्मा यावेळीही चालला नसल्याने त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली.

04 Jun, 24 07:15 PM

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे १ लाख १३ हजार मतांनी विजयी

दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी शरद पवार गट) भास्कर भगरे 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजयी झाल्या आहेत.

04 Jun, 24 06:59 PM

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंची आघाडी

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंची आघाडी घेतली आहे.  30 वी फेरी झाली आहे. यात राजाभाऊ वाजे- 6,14,517 तर  हेमंत गोडसे- 4,53,414 यांना एवढी मतं मिळाली आहे. 
शांतिगिरीजी महाराज यांना- 44,415 एवढी मतं मिळाली आहेत.  राजाभाऊ वाजे यांनी 1,61,103 इतक्या मतांची आघाडी घेतली आहे.

04 Jun, 24 06:33 PM

धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमदेवार धैर्यशील मोहिते-पाटील हे विजयी झाले आहेत. विजयानंतर सोलापूरसह माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, अकलूज येथे विजयी जल्लोष सुरू आहे. जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. 
 

04 Jun, 24 05:48 PM

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा मोठा विजय

बारामती लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात  सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती, यात आता सुप्रिया सुळे यांचा १ लाख ५३ हजार ०४८ मतांनी विजय झाला आहे. सुप्रिया सुळे यांना ७ लाख २८०६८ मते मिळाली आहेत. तर  सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७४ हजार ५३८ मते मिळाली आहेत.

04 Jun, 24 05:34 PM

यवतमाळमध्ये संजय देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मतमोजणीच्या २३ फेऱ्या झाल्या असून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे महायुतीच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राजश्री पाटील यांच्यापेक्षा ७६ हजार ४११ मताधिक्याने पुढे आहेत. आता मतमोजणीच्या सात फेऱ्या बाकी असून महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. 

04 Jun, 24 05:33 PM

नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.  विजयी उमेदवार- अॅड. गोवाल पाडवी यांना 7,45,998 एवढी मतं मिळाली आहेत, तर डाॅ.हिना गावित (भाजप)  यांना 5,86,878 एवढी मतं मिळाली आहेत. पाडवी यांना 1,59,120 एवढ्या मतांचं मताधिक्य मिळालं आहे.

04 Jun, 24 05:20 PM

ओमराजे निंबाळकरांना बार्शी तालुक्यातून मिळाला ५५ हजाराचा लीड

सोलापूर : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. २४ व्या फेरीअखेर ते अडीच लाखांच्या मताधिक्क्याने आघाडीवर आहेत. अंतिम निकाल हाती येणे बाकी असून विजयी घोषित अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील  बार्शी तालुक्यातून ओमराजे निंबाळकरांना ५५ हजाराचा लीड मिळाला आहे.

04 Jun, 24 05:14 PM

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ अखेरची फेरी; संजय दिना पाटील २९ हजार १५ मतांनी विजयी

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ अखेरची फेरी झाली आहे, संजय दिना पाटील २९ हजार १५ मतांनी विजयी झाले आहे. मिहीर कोटेचा यांना ४ लाख १९ हजार ५८९ मतं मिळाली आहेत.

04 Jun, 24 05:04 PM

जालन्यात भाजपाच्या गडाला हादरा; कल्याण काळेंचे समर्थक विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत

जालन्यात भाजपाच्या गडाला हादराला बसला आहे, रावसाहेब दानवे पिछाडीवर आहेत, तर कल्याण काळेंचे समर्थक विजयी गुलाल उधळण्याच्या तयारीत आहेत. 

04 Jun, 24 05:01 PM

गडकरी यांच्या घरी कार्यकर्त्यांचा जल्लोष

नागपूर :  भारतीय जनता पार्टीचा विजय असो..., नितीनजी गडकरी आगे बढो...,  अशा घोषणा देत, ढोलताशांचा गजरात, गुलाल उधळीत, पेढे भरवित कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या घरी दुपारी जल्लोष करायला सुरुवात केली. भाजपाचे झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते दुचाकीवरस्वार होऊन त्यांच्या निवासस्थानी येत होते. त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. येथे मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी केली होती.

04 Jun, 24 05:01 PM

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० व्या फेरीत संजय दिना पाटील २९ हजार मतांनी आघाडीवर

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० व्या फेरीत संजय दिना पाटील  ४ लाख  ३३ हजार ९२८ मत मिळाली आहेत, तर  मिहीर कोटेचा यांना ४ लाख ०४ हजार ०४४ मतम मिळाली असून संजय दिना पाटील २९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

04 Jun, 24 04:44 PM

अकोला लोकसभा मतदारसंघ २१ व्या फेरीत अनुप धोत्रेंची २३,३२८ मतांनी आघाडीवर

अकोला लोकसभा मतदारसंघ २१ व्या फेरीत अनुप धोत्रेंची २३,३२८ मतांनी आघाडीवर आहेत.  अभय पाटील यांना २१ फेरीत १६ हजार ७२३ मते तर एकूण मते ३६६ हजार ५५९ मत आहेत. प्रकाश आंबेडकर यांना २१ व्या फेरीत १०८८४ मते तर एकूण मतं दोन लाख ३२ हजार १६२ आहेत.

04 Jun, 24 04:34 PM

रामटेक लोकसभा मतदारसंघातून तेराव्या फेरीनंतर श्यामकुमार बर्वे आघाडीवर

रामटेक लोकसभा मतदारसंघातून तेराव्या फेरीनंतर श्यामकुमार बर्वे ५३,०६३ मतांनी आघाडीवर आहेत.

04 Jun, 24 04:02 PM

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके ५१ हजार मतांनी पुढे

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात १९ व्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे निलेश लंके ५१ हजार मतांनी पुढे आहेत.

04 Jun, 24 03:52 PM

उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांची आघाडी

उत्तर मध्य मुंबईत मतमोजणीच्या चौदाव्या फेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांना मागे टाकून 793 मतानी आघाडी घेतली आहे.

04 Jun, 24 03:50 PM

यवतमाळ वाशिम लोकसभा अठराव्या फेरीत संजय देशमुख ६५,२८० मतांनी आघाडीवर

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अठराव्या फेरीत संजय देशमुख ६५,२८० मतांनी आघाडीवर आहेत.   राजश्री पाटील (महायुती) - ३,३१,३७४ मतं आहेत तर  संजय देशमुख-(महाविकास आघाडी)  ३,९६,६५४ मत मिळाली आहेत.

04 Jun, 24 03:41 PM

उज्वल निकम यांच मताधिक्य घटले!

मतमोजणीच्या तेराव्या फेरीत वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेत 3 लाख 82 हजार 174 मते मिळाली आहेत तर उज्वल निकम यांना 3 लाख 85 हजार 695 मते आहेत.

04 Jun, 24 03:39 PM

साताऱ्यात उदयनराजे ३१,२१७ मतांनी विजयी

सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे ३१,२१७ मतांनी विजयी झाले आहेत.

04 Jun, 24 03:26 PM

धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना ११ व्या फेरीअखेर ३८ हजार २१५ मताची आघाडी मिळाली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा मार्ग विजयाच्या दिशेने जात असून अकलूज शहरात खासदारकीचे बॅनर दुपारपासूनच झळकू लागले आहेत.

04 Jun, 24 03:26 PM

जळगावच्या दोन्ही जागा भाजपकडे, मतमोजणी अंतिम टप्यात

जळगाव  : जळगाव व रावेर मतदारसंघांची मतमोजणी अंतिम टप्यात असून या दोन्ही जागांवर स्मिता वाघ व रक्षा खडसे यांचा विजय निश्चित झाला आहे. स्मिता वाघ यांचा दोन ते अडीच लाखांनी तर रावेर मधून रक्षा खडसे या दोन लाखांच्या मताधिक्यांनी निवडणून येत असल्याचे दिसून येत आहे. 

04 Jun, 24 03:11 PM

मुंबई उत्तर पूर्व - १४ वी फेरीत संजय पाटील आघाडीवर

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात संजय दिना पाटील यांना ३२७२१६ एवढा मतं आहेत तर मिहिर कोटेचा यांना ३०२४५५ एवढी णत असून संजय पाटील यांची २४ हजार ७६१ मतांनी आघाडीवर आहेत.

04 Jun, 24 02:54 PM

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कीर्तिकर आघाडीवर

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिककर ३,६४९ मतांनी आघाडीवर आहेत.

04 Jun, 24 02:50 PM

नाशिक : १४ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे १ लाख २३ हजार २३ मतांनी आघाडीवर

नाशिक : १४ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे १ लाख २३ हजार २३ मतांनी आघाडीवर आहेत. वाजे यांना ३,८९,९७८ मते तर हेमंत गोडसे यांना २,६६,९५५ मतं आहेत.

04 Jun, 24 02:37 PM

सांगली लोकसभेत विशाल पाटील यांचा विजय

सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या संजयकाका पाटील यांचा पराभव झाला आहे. 

04 Jun, 24 02:33 PM

१४ व्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

बुलढाणा : लोकसभा मतदारसंघाच्या मोजणीदरम्यान १४ व्या फेरीपासूनच शिंदेसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी १३ हजारांपेक्षाही अधिक आघाडी घेत १७ फेरीनंतरही ती कायमच असल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोषाला सुरूवात केली. 

04 Jun, 24 02:27 PM

संजय दिना पाटील हे ८८ हजारांनी आघाडीवर

मुंबई उत्तर पूर्व, संजय दिना पाटील हे ८८ हजारांनी आघाडीवर

04 Jun, 24 02:24 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात काँग्रेसची जोरदार मुसंडी 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात काँग्रेसची जोरदार मुसंडी 

04 Jun, 24 02:23 PM

नारायण राणे ४५१३२ मतांनी आघाडीवर

अठराव्या फेरीनंतर नारायण राणे ४५१३२ मतांनी आघाडीवर.

04 Jun, 24 02:22 PM

शिंदे गटाकडून ढोल ताशांच्या गजरात मतदारसंघाबाहेर जल्लोष

कल्याण: कल्याण मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य लाखांच्या आसपास पोहोचताच शिंदे गटाकडून ढोल ताशांच्या गजरात मतदारसंघाबाहेर जल्लोष सुरु करण्यात आला. याला ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतला. अद्याप पूर्ण निकाल लागला नसताना पोलिसांनी जल्लोष करायला परवानगी कशी दिली असा सवाल ठाकरे गटाकडून पोलिसांना करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. ठाकरे गटाकडून निषेधार्थ घोषणाबाजी सुरु झाली. यावर पोलिसांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना जल्लोष थांबवायला सांगितला. यादरम्यान काहीसे तणावपूर्ण वातावरण मतमोजणी केंद्र परिसराच्या बाहेर निर्माण झाले होते.

04 Jun, 24 02:20 PM

शिर्डी - सातव्या फेरीअखेर उबाठाचे भाऊसाहेब वाकचौरे 19465 मतांनी आघाडीवर....

शिर्डी - UBT चे भाऊसाहेब वाकचौरेंना एकूण 2 लाख 10 हजार 300 मते तर 

शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना एकूण 1 लाख 90 हजार 835 मते 

सातव्या फेरीअखेर UBT चे भाऊसाहेब वाकचौरे 19465 मतांनी आघाडीवर....

04 Jun, 24 02:19 PM

नितीन गडकरी ६०१४३ मतांनी आघाडीवर

 ९ फेरीनंतर भाजप नेते नितीन गडकरी ६०१४३ मतांनी आघाडीवर. 
 

04 Jun, 24 02:05 PM

प्रतापराव जाधव १५ हजार ९६८ मतांनी आघाडीवर

बुलढाणा लोकसभा मतदार १६ व्या फेरी अखरे शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव १५ हजार ९६८ मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 02:04 PM

अकरावी फेरीत उज्वल निकम यांना धक्का, वर्षा गायकवाड यांची १७६३ मताने आघाडी 

चुरशीची लढत सुरू असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात अकराव्या फेरीत महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांना धक्का बसला. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी १७६३ मतांनी आघाडी घेत मतदार संघातील चित्र बदलले आहे. 

04 Jun, 24 01:57 PM

सुनील तटकरे यांना 62 हजार 732 मतांची आघाडी

रायगड - 23 व्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना 62 हजार 732 मतांची आघाडी

04 Jun, 24 01:52 PM

बुलढाण्यात मतमोजणी निर्णायक वळणावर, शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव आघाडी टिकवून

बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मध्यमगतीने सुरू असून ती आता निर्णायक टप्प्यात आली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मतमोजणीच्या २५ पैकी १४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून सुरुवातीपासूनच शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली आहे. त्यांना उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर हे चांगली टक्कर देत असून उर्वरीत दहा फेऱ्यामध्ये काय उलटफेर होतो याकडे लक्ष लागून रहाले आहे.

04 Jun, 24 01:48 PM

नंदुरबार: काॅग्रेसचे गोवाल पाडवी 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर

नंदुरबार: 22 व्या फेरीत काॅग्रेसचे गोवाल पाडवी 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर.

04 Jun, 24 01:47 PM

रावेरमध्ये रक्षा खडसे यांना आघाडी

रक्षा खडसे ३६९२९३
श्रीराम पाटील २२३४१०
मताधिक्य-१४५८८३

04 Jun, 24 01:45 PM

भिवंडी लोकसभा - आठव्या फेरीत बाळ्या मामा 26850  मतांनी आघाडीवर

आठवी फेरी 

कपिल पाटील - 139655
बाळ्या मामा - 166505
निलेश सांबरे - 85722

आठव्या फेरीत बाळ्या मामा 26850  मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 01:43 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघ - श्रीकांत शिंदे ८२३१५ मतांनी आघाडीवर

सातव्या फेरी अंती मिळालेली मते

श्रीकांत शिंदे- १८३६३४
वैशाली दरेकर-१०१३१९

श्रीकांत शिंदे -८२३१५ मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 01:38 PM

मुंबई उत्तर मध्य, उज्ज्वल निकम आघाडीवर

दहावी फेरी - मुंबई उत्तर मध्य. उज्ज्वल निकम आघाडीवर

04 Jun, 24 01:37 PM

भाजपची पुन्हा बाले किल्ल्यावर सरशी, पीयूष गोयल यांनी केला तीन लाख मतांचा आकडा पार 

मुंबई उत्तर हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला म्हणून समजला जातो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपल्या बालेकिल्ल्यावर सरशी केली आहे. मतदानाच्या आतापर्यंतच्या सहा फेऱ्यांमध्ये पीयूष गोयल यांना तीन लाख तीन हजार 583 मते मिळाली आहेत. दुसरीकडे भूषण पाटील यांना एक लाख 57 हजार 479 मते मिळाली आहेत. पीयूष गोयल हे एक लाख 46 हजार 104 मतांनी आघाडीवर आहेत.

04 Jun, 24 01:33 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे ३४,७९५ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - पंधराव्या फेरीनंतर नारायण राणे ३४,७९५ मतांनी आघाडीवर.

04 Jun, 24 01:32 PM

चंद्रपूर - काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर

काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर. भाजपचे सुधीर मुनगंटीवार 82084 मतांनी पिछाडीवर.

04 Jun, 24 01:25 PM

यवतमाळ - वाशीम मतदासंघ,देशमुख 46,945 मतांनी आघाडीवर

यवतमाळ - वाशीम मतदासंघ
14 वी फेरी
राजश्री पाटिल (महायुती) - 2,59,867
संजय देशमुख ( महाविकास आघाडी ) - 3,06812
देशमुख - 46,945 मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 01:23 PM

मुंबई उत्तर पूर्व -संजय दिना पाटील आघाडीवर

मुंबई उत्तर पूर्व - २७६३३ मतांनी संजय दिना पाटील आघाडीवर

04 Jun, 24 01:20 PM

डाॅ. नामदेव किरसान यांना ३२,६८३ मतांची लीड

गडचिराेली : गडचिराेली- चिमूर लाेकसभा मतदार संघात पहिल्या राऊंडपासूनच काॅंग्रेसचे डाॅ. नामदेव किरसान हे आघाडीवर आहेत. यात डाॅ. नामदेव किरसान यांना ३२,६८३ मतांची लीड मिळाली आहे.

04 Jun, 24 01:19 PM

चौदाव्या फेरीनंतर नारायण राणे २७२६९ मतांनी आघाडीवर

चौदाव्या फेरीनंतर नारायण राणे २७२६९ मतांनी आघाडीवर.

04 Jun, 24 01:16 PM

भिवंडी लोकसभा - सातव्या फेरीत बाळ्या मामा 29145  मतांनी आघाडीवर

सातवी फेरी 

कपिल पाटील - 119562
बाळ्या मामा - 148707
निलेश सांबरे - 76835

सातव्या फेरीत बाळ्या मामा 29145  मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 01:11 PM

उत्तर मध्य मुंबई - उज्ज्वल निकम आघाडीवर

आठवी फेरी 
उज्वल निकम  - 26,843
वर्षा गायकवाड - 19,565

एकूण मतदान 
उज्वल निकम - 2,03,303
वर्षा गायकवाड - 1,48,304

04 Jun, 24 01:10 PM

अमरावती जिल्हा, नवनीत राणा आघाडीवर

नवनीत राणा ( भारतीय जनता पाटी)  : 146467

बळवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)  :  135295

दिनेश बूब (प्रहार जनशक्ती पार्टी) : 24289

आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना)  : 3415

04 Jun, 24 01:04 PM

बुलढाणा लाेकसभा मतदार संघ बाराव्या फेरीअखेर 13144 मतांनी प्रतापराव जाधव यांना आघाडी

प्रतापराव जाधव (शिंदेंसेना) 184475

प्रा नरेंद्र खेडेकर (उद्धवसेना) 171331

रविकांत तुपकर (अपक्ष) 121959

13144 मतांनी प्रतापराव जाधव यांना आघाडी

04 Jun, 24 01:03 PM

वर्धा : चौथ्या फेरीतही काळे यांची आघाडी कायम

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात चार फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे ९ हजार ४१३ मतांनी आघाडीवर आहे. चार फेऱ्यांअंती त्यांना एकूण ८६ हजार ४४४, तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना ७७ हजार ३१ मते मिळाली.

04 Jun, 24 01:01 PM

ठाणे लोकसभा म्हस्के 104698 मतांनी आघाडीवर

ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 301668
राजन विचारे - 196970
म्हस्के आघाडी -104698

04 Jun, 24 01:01 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे -४६०४२ मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरी अंती मिळालेली मते

श्रीकांत शिंदे- १०५२३४
वैशाली दरेकर-५९१९२

श्रीकांत शिंदे -४६०४२ मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:58 PM

भंडारा गोंदिया अपडेट -  काँग्रेस उमेदवार 942 मतांनी भाजपाच्या पुढे

 भाजपा : सुनील मेंढे  - 1,54,933
 काँग्रेस : प्रशांत पडोळे  - 1,55,875
 बसपा : संजय कुंभलकर - 7,066

 काँग्रेस उमेदवार 942 मतांनी भाजपाच्या पुढे

04 Jun, 24 12:57 PM

मुंबई उत्तर पूर्व संजय पाटील २० हजार ४८२ मतांनी आघाडीवर

मुंबई उत्तर पूर्व - 
संजय पाटील - २२६८५४
मिहिर कोटेचा - २०६३७२ 
संजय पाटील २० हजार ४८२ मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:56 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरीअंती श्रीकांत शिंदे ३४६०६ मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अंती मिळालेली मते

श्रीकांत शिंदे- ७९२९१
वैशाली दरेकर-४५१८५

श्रीकांत शिंदे -३४६०६ मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:51 PM

 उत्तर मध्य मुंबई उज्ज्वल निकम आघाडीवर

 उत्तर मध्य मुंबई 

सातवी फेरी 
उज्वल निकम  - 27,757
वर्षा गायकवाड - 18,906

एकूण मतदान 
उज्वल निकम - 1,76,460
वर्षा गायकवाड -1,28,739

04 Jun, 24 12:49 PM

नेस्को मतदार मोजणी कक्षात तांत्रिक बिघाड

नेस्को मतदार मोजणी कक्षात तांत्रिक बिघाड झाल्याने अपडेट्स मिळण्यास उशीर होत आहे.

04 Jun, 24 12:44 PM

भंडारा गोंदिया - काँग्रेस उमेदवार 317 मतांनी पहिल्यांदाच भाजपाच्या पुढे

भंडारा गोंदिया अपडेट
 भाजपा : सुनील मेंढे  - 1,41,209
 काँग्रेस : प्रशांत पडोळे  - 1,41,526
 बसपा : संजय कुंभलकर - 6,471

 काँग्रेस उमेदवार 317 मतांनी पहिल्यांदाच भाजपाच्या पुढे

04 Jun, 24 12:43 PM

ठाणे लोकसभा म्हस्के ९९ हजार मतांनी आघाडीवर

ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के - 281127
राजन विचारे - 181760
म्हस्के आघाडी - 99367

04 Jun, 24 12:41 PM

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा वायकर यांची 3502 मतांची आघाडी

सहाव्या फेरीचा निकाल

अमोल कीर्तिकर    उद्धव सेना  19454

रवींद्र वायकर     शिंदे सेना       22956

वायकर यांची मतांची आघाडी-   3502

04 Jun, 24 12:40 PM

सुनील तटकरे 44 हजार 429 मतांनी आघाडीवर

रायगड लोकसभा मतमोजणी  15 वी  फेरी: सुनील तटकरे 44 हजार 429 मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:34 PM

दिंडोरी लोकसभा भास्कर भगरे आघाडीवर

नववी फेरी अखेर  

भास्कर भगरे २,१९, ४९९

भारती पवार १,९०,७७६

भास्कर भगरे यांची
२८,७२३ मतांनी आघाडी

04 Jun, 24 12:28 PM

रामटेक - काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 35,632 मतांनी आघाडीवर

रामटेक - सहाव्या फेरीनंतर 

काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 35,632 मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:28 PM

मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई आघाडीवर

अकरावी फेरी 
अनिल देसाई - 231157
राहुल सावंत - 206374
---
आघाडी - 24783

04 Jun, 24 12:25 PM

नितीन गडकरी ४७३९८ मतांनी आघाडीवर

५ फेरीनंतर भाजप नेते नितीन गडकरी ४७३९८ मतांनी आघाडीवर. 

नितीन गडकरी (भाजप) : १९१८४८
विकास ठाकरे (काँग्रेस) : १४४४५०

04 Jun, 24 12:20 PM

मिहिर कोटेचा ३१९० मतांनी आघाडीवर

* मुंबई उत्तर पूर्व - 

संजय दिना पाटील -  १ लाख ७८  हजार २८३

मिहीर कोटेचा -  १ लाख ८१  हजार ४७३

मिहिर कोटेचा ३१९०  मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:19 PM

रायगड - सुनील तटकरे आगाडीवर

रायगड १४ वी फेरी

सुनील तटकरे ४० हजार ८२८ ची आघाडी

04 Jun, 24 12:18 PM

प्रतिभा धानोरकर 61,760 मतांनी आघाडीवर

चंद्रपूर - चौथ्या फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा 61,760 मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:17 PM

नाशिक- उद्धव सेनेचे राजाभाऊ वाजे १ लाखांच्या फरकाने आघाडीवर

सलग चौथ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट होत चालली असून नवव्या फेरी अखेरीस उद्धव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी १ लाख ३ हजार मतांची आघाडी घेतल्याने
त्यांच्या पक्षात जल्लोष सुरू झाला आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादीचेच समीर भुजबळ यांना अनुक्रमे १ लाख ८७ हजार आणि २ लाख ९२ हजार मतांनी हेमंत गोडसे यांनी पराभूत करून ते जायंट
किलर ठरले होते. 

04 Jun, 24 12:16 PM

साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर

सातारा : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदार संघाचा निकाल फेरीनिहाय समोर येत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. पाचव्या फेरीअखेर शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ तर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना १ लाख २८ हजार ३७५ मते मिळाली. शशिकांत शिंदे १२ हजार ७०७ मतांनी आघाडीवर आहेत.

04 Jun, 24 12:06 PM

मुंबई उत्तर पूर्व - दुपारी बारा वाजेपर्यंत

संजय दिना पाटील -  १ लाख ७१  हजार ७२८

मिहीर कोटेचा -  १ लाख ६२  हजार ३६१

संजय दिना पाटील  ९४२१  मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:05 PM

चंद्रपूर लोकसभा निवडणूक २०२४

काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा 47739 मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:04 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नारायण राणे आघाडीवर...

दहाव्या फेरीनंतर नारायण राणे १८९४९ मतांनी आघाडीवर.

04 Jun, 24 12:03 PM

अकोला - डॉक्टर अभय पाटील हे 13 हजार 750 मतांनी आघाडीवर

आठव्या फेरी अखेर मतमोजणी
भाजपचे अनुप धोत्रे यांना आठव्या फेरीत 18 449 मध्ये तर ऐकून मते एक लाख 31 हजार 741
महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांना 17 हजार 998 ऐकून मते एक लाख 45 हजार 491
वंचित चे प्रकाश आंबेडकर यांना आठव्या फेरीत 13 हजार 95 तर ऐकून मते 94 281 प्राप्त झाली आहेत.
डॉक्टर अभय पाटील हे 13 हजार 750 मतांनी आघाडीवर आहेत.

04 Jun, 24 12:01 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघ 

दुसऱ्या फेरी अंती मिळालेली मते

श्रीकांत शिंदे- ५२६७५
वैशाली दरेकर-३०९६५

श्रीकांत शिंदे -२१७१० मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 12:00 PM

मुंबई दक्षिण मध्य

नववी फेरी
अनिल देसाई - 190005
राहुल शेवाळे - 168502

अनिल देसाई 21 हजार 503 मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 11:59 AM

सातव्या फेरी अखेर राम सातपुतेंना 15 हजारांची आघाडी; प्रणिती शिंदे पिछाडीवर

सोलापूर : तिसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे यांनी एकूण 10 हजार 256 मतांनी आघाडी  घेतली होती. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सातव्या फेरी अखेर 15000 मतांनी पिछाडीवर आहेत. शिंदे यांची लीड तोडून सध्या राम सातपुतेंनी 15 हजारांची आघाडी घेतली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. सध्या आठव्या फेरीची मतमोजणी  सुरू आहे.

04 Jun, 24 11:57 AM

बुलढाणा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव आघाडीवर

बुलढाणा : महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर 11034 मतांची आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर हे दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांना 79388 मते पडली आहेत.

04 Jun, 24 11:56 AM

रावेर

रक्षा खडसे २१३७९४
श्रीराम पाटील १३६२२५
मताधिक्य-७७५६९

04 Jun, 24 11:51 AM

२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा

चौथ्या फेरीचा निकाल

अमोल कीर्तिकर   उद्धव सेना 21111

रवींद्र वायकर     शिंदे सेना   18231

मतांची आघाडी-      2880

04 Jun, 24 11:47 AM

बुलढाणा लाेकसभा मतदार संघ

सहाव्या फेरी अखेर 

प्रतापराव जाधव (शिवसेना) 90422

प्रा नरेंद्र खेडेकर (शिवसेना- उबाठा) 79388

रविकांत तुपकर (अपक्ष) 62170

04 Jun, 24 11:46 AM

जळगावात भाजपाच्या स्मिता वाघ एक लाख मतांनी पुढे

जळगाव - जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील एफसीआय गोदामात सकाळपासून मतमोजणी सुरू झालेली असून, जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून करण पवार रिंगणात आहेत. स्मिता वाघ यांना २, ४०, ७२१, तर करण पवार यांना १, ३३, ७७२ मते आतापर्यंत मिळालेली आहेत.

04 Jun, 24 11:45 AM

पालघर लोकसभा सहाव्या फेरी अखेर भाजपचे डॉ. हेमंत सवरा ४० हजार ७८० मतांनी पुढे

पालघर :- पालघर लोकसभा सहाव्या फेरी अखेर भाजपचे डॉ. हेमंत सवरा ( १ लाख ४६ हजार ७०७) ४० हजार ७८० मतांनी पुढे आहेत. दोन नंबरवर महाविकास आघाडीच्या भारती कामडी (१लाख ५ हजार ९२७) ह्या दोन नंबर वर आहेत

04 Jun, 24 11:42 AM

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ

 फेरी : 2

1. बसपा :  संजय कुंभलकर - 1,788
2. काँग्रेस : प्रशांत पडोळे :- 43,289
3. भाजपा : सुनील मेंढे - 46,385
4. अभा परिवार पार्टी : अजय कुमार भारती - 381
5. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया : देवीलाल नेपाळे - 182
6. लोक स्वराज्य पार्टी : विलास लेंडे - 123
7. वंचित बहुजन आघाडी : संजय केवट - 1,241
8. अपक्ष : डॉ आकाश जिभकाटे - 177
9. अपक्ष : शरद इटवाले - 51
10. अपक्ष : चैत्राम कोकासे - 75
11. अपक्ष : तुळशीराम गेडाम - 87
12. अपक्ष : प्रदीप ढोबळे - 101
13. अपक्ष : बेनिराम फुलबांधे - 134
14. अपक्ष : वीरेंद्र कुमार जयस्वाल - 238
15. अपक्ष : विलास राऊत - 125
16. अपक्ष : सुमित पांडे - 314
17. अपक्ष : सूर्यकिरण नंदागवळी - 119
18. अपक्ष : सेवक वाघाये-  1,094

04 Jun, 24 11:40 AM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

सातव्या फेरीनंतर नारायण राणे ९८७९ मतांनी आघाडीवर.

04 Jun, 24 11:39 AM

ठाणे लोकसभा

नरेश म्हस्के - 194449
राजन विचारे - 132203
म्हस्के आघाडी - 62246

04 Jun, 24 11:37 AM

मुंबई दक्षिण मध्य

आठवी फेरी
अनिल देसाई - 169840
राहुल शेवाळे - 146919

अनिल देसाई 22 हजार 900 मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 11:36 AM

मुंबई उत्तर पूर्व

संजय दिना पाटील - १ लाख ४० हजार ७४९

मिहीर कोटेचा - १ लाख ३६ हजार ९५६

संजय दिना पाटील  ३७९३  मतांनी आघाडीवर

04 Jun, 24 11:36 AM

सोलापूर लोकसभा मतमोजणी

1)प्रणिती शिंदे(काँग्रेस) 1,62,945
2)राम सातपुते(भाजप) 1,70,730

मताधिक्य-7785(भाजप)

04 Jun, 24 11:35 AM

अकाेला लाेकसभा मतदार संघ

सहावी फेरी अखेर 

डॉ़ अभय पाटील (काँग्रेस) १०३,३६४

अनुप धोत्रे-(भाजप)९७,६७१

प्रकाश आंबेडकर-(वंचित)७२,४३७

५,६९३ मतांची डाॅ. पाटील आघाडीवर

अकाेला लाेकसभा मतदार संघात ११ लाख ६८ हजार ३६६ एवढे मतदान झाले़ सहाव्या फेरी अखेर २ लाख ८०,४८ मतांची माेजणी झाली आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४