शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 04:26 PM2024-06-07T16:26:44+5:302024-06-07T16:29:44+5:30

अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात होता.

maharashtra lok sabha result 3 MLAs from Sharad Pawars party will come with us Ajit Pawars NCP claim | शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा

शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा

Ajit Pawar NCP ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत ४ जागा लढवणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर यश मिळवता आलं. तसंच बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे. मात्र हा दावा खोडून काढत शरद पवारांच्या पक्षातीलच दोन ते तीन आमदार आमच्यासोबत येणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून पक्षांतराबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या बाष्कळ गप्पा असून या अफवांना काही आधार नाही. त्याउलट गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर शरद पवार गटातील काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असून पावसाळी अधिवेशनापर्यंत शरद पवार गटातीलच दोन ते तीन आमदार हे आमच्यासोबत येणार आहेत," असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वी कोणत्या पक्षातील आमदार पक्षांतर करणार आणि कोणाचे आमदार आपल्या नेत्याला ठामपणे साथ देणार, याबाबतचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

जयंत पाटलांनी नेमकं काय म्हटलं आहे? 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षातील संभाव्य इनकमिंगबद्दल काल सूचक वक्तव्य केलं. निवडणूक निकालापासून माझा मोबाईलचा वापर वाढलाय, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १८ ते १९ आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. खरंच हे आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत का?" असा प्रश्न पत्रकारांकडून जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर पाटील म्हणाले की, "रोहित पवार यांना काही बाहेरचे आमदार संपर्क करत असतील. मात्र या विषयावर मला लगेच काही बोलायचं नाही. या आमदारांबाबत मी योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती देईल. तुम्हाला अंधारात ठेवून आम्ही काही करणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Web Title: maharashtra lok sabha result 3 MLAs from Sharad Pawars party will come with us Ajit Pawars NCP claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.