Maharashtra Mask Compulsory: राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरणं आता बंधनकारक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं पहिलं पाऊल राज्य सरकारनं टाकलं आहे. राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं कळकळीचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढत होत असल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मास्क वापराबाबतच्या सूचनांचं एक पत्रक जारी केलं आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह अशा ठिकाणी मास्क वापरणं महत्वाचं असणार आहे. यासोबतच रुग्णालय, शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी देखील मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मास्क न वापरण्याऱ्यांवर कारवाई केली जाणार का? याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या नव्या व्हायरसची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने नव्याने निर्बंध लावणार असल्याचं सांगितलंय. यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश आहे.
राज्यात नेमकी कोणकोणत्या ठिकाणी मास्कसक्ती?रेल्वेबससिनेमागृहरुग्णालयकॉलेजशाळाबाजारपेठ