नागपूर : नागपुरातील प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉ. संजीव चौधरी, डॉ. सुधीर बाभुळकर, डॉ. वैशाली शेलगावकर व प्रसिद्ध किडनीतज्ज्ञ डॉ. वीरेश गुप्ता यांना २०१५ चा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या राज्यातील नामवंत डॉक्टरांच्या सेवेचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने प्रथमच या पुरस्काराची सुरुवात केली. वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरिता राज्यभरातून शेकडो डॉक्टरांच्या नावाची शिफारस विविध वैद्यकीय संघटनांतर्फे झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्व शिफारशींचा सखोल अभ्यास केल्यानंतर राज्यातील १३ नामवंत डॉक्टरांची या पुरस्काराकरिता निवड केली. याव्यतिरिक्त डॉ. लाहू कदम (पुणे), डॉ. सीमा खिनवासरा (पुणे), डॉ. राजेंद्रप्रसाद तिवारी (डहाणू), डॉ. विजया अहिरराव (धुळे), डॉ. वर्षा वारके (अकोला), डॉ. अविनाश सुपे (मुंबई), डॉ. सुचित्रा पंडित (मुंबई), डॉ. कविता रेंगे (अमरावती), डॉ. सागर मुंधडा (मुंबई) यांचाही यात समावेश आहे.(प्रतिनिधी)
नागपूरच्या चौघांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल पुरस्कार
By admin | Published: March 24, 2016 1:23 AM